एक्स्प्लोर

Pooja Khedkar Father Dilip Khedkar: ड्रग्ज देऊन आम्हाला संपवण्याचा प्रयत्न, पोलिसांची दुटप्पी भूमिका, पूजा खेडकरच्या वडिलांचे गंभीर आरोप; घरातील चोरीबाबत सगळंच सांगितलं

Pooja Khedkar Father Dilip Khedkar: बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या पुण्यातील औंध परिसरातील नॅशनल हाऊसिंग सोसायटीमधील बंगल्यात चोरी झाली होती.

Pooja Khedkar Father Dilip Khedkar: बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या (Pooja Khedkar) पुण्यातील औंध परिसरातील नॅशनल हाऊसिंग सोसायटीमधील बंगल्यात रविवारी 11 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात बंगल्यात काम करणाऱ्या एका नोकराने मध्यरात्री पूजा खेडकर यांना दोरीने बांधून ठेवले, असा आरोप करण्यात येत आहे. तसेच, त्यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्यात आल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे. त्यानंतर चोरट्यांनी घरातील कपाटे फोडून मौल्यवान वस्तू लंपास केल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण घटनेवर आता पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांनी धक्कादायक आरोप केले असून, या चोरीमागे नेमके कोण आहे आणि घटना कशी घडली, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दिलीप खेडकर म्हणाले की,  आमच्या घरी केवळ चोरी झाली म्हणून पत्रकार परिषद घेत आहे.  पोलिसानी दुर्लक्ष केले, आम्ही बनाव केला, असा गैरसमज पसरवला गेला.  ड्रग्ज वापरून आमचा खून करण्याचा प्रयत्न झाला आहे. ते ड्रग्स पुण्यात कुठेच उपलब्ध नाहीत. आम्हाला पाच दिवस हॉस्पिटलमध्ये ट्रिटमेंट घ्यावी लागली.  शेतात झालेल्या भांडणाची दखल घेतली जाते. पण, या जबरी चोरीची पोलिसांनी दखल घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला. 

Pooja Khedkar Father Dilip Khedkar : पोलिसांची भूमिका दुटप्पी

दिलीप खेडकर पुढे म्हणाले की, या प्रकरणात अजूनपर्यंत कोणताच तपास नाही. नको तेव्हा पुणे पोलीस गेटवरून आमच्या घरी येतात.  पोलीस आयुक्त आमचे शस्त्रपरवाने रद्द करतात.  पोलिसांची भूमिका दुटप्पी आहे. आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे.  लवकर उपचार मिळाले म्हणून आम्ही वाचलो आहोत.  पोलिसांकडून हलगर्जीपणा केला जातोय.  त्यांनी जर ठरवलं तर लगेच चोरांना पकडलं जाईल.  पोलिसांचं रेट कार्ड देखील ठरलेलं असतं.  शासन आणि प्रशासन काम करत नाही.  

Pooja Khedkar Father Dilip Khedkar: प्रकरणाची SIT चौकशी झाली पाहिजे

आमच्या शेजारी राजभवन आहे. पोलीस अधीक्षकांचा बंगला आहे.  आम्ही नोकर देखील चांगल्या कंपनीकडून घेतला होता.  तरी पण त्यांनी बनाव करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आमच्या कुटुंबाला प्रत्येक वेळी टार्गेट केलं जात आहे. साधा अपघात झाला असताना 15 दिवस पोलीस आमच्या घराबाहेर होते. गरज नसताना खंडणीचा गुन्हा दाखल केला जातो. पण, या प्रकरणात मात्र पोलीस भूमिका घेत नाहीत.  बाहेरच्या देशातील लोक बाहेरून येवून अस करत असतील तर यंत्रणा काय काम करत आहे? या प्रकरणाची SIT चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी दिलीप खेडकर यांनी केली. 

Pooja Khedkar Father Dilip Khedkar: ठराविक गोष्टीचीच चोरी केली  

हिकमत शाहिद असं या आरोपीचे नाव असून तो नेपाळचा आहे. आमच्या घरात 7 लोक आले होते, बाहेर पण 7-8 लोक होते. सगळे मिळून 15 सराईत गुन्हेगार होते. चोरी करण्यासारखं घरात खूप काही होतं पण ठराविक गोष्टी घेवून गेले. 3-4 लाख रुपये कॅश आणि काही सोनं चोरीला गेलं आहे.  आम्हाला प्लॅन करून मारण्यासाठी ते आले होते. एका महिन्यात आम्हाला त्या व्यक्तीवर संशय आला नाही. या घटनेमुळे मनोरमा खेडकर यांना खूप त्रास झालाय. आम्ही त्यांना अजून सगळं सांगितलं नाही. त्यांना चक्कर आली, असं सांगितलं आहे, असे देखील दिलीप खेडकर यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

Pune News: मला नोकरीची गरज नाही मी गंमत म्हणून...; इंदापूर भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्याचा मुजोरपणा, व्हिडिओ व्हायरल

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
दीड लाखांची लाच स्वीकारताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाच पकडलं, जालन्यात खळबळ, पाच जण ACB च्या जाळ्यात 
दीड लाखांची लाच स्वीकारताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाच पकडलं, जालन्यात खळबळ, पाच जण ACB च्या जाळ्यात 
Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
Beed Jail Walmik Karad: बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget