सोशल मीडियावर विवाहितेचे अश्लील फोटो टाकणाऱ्या तरुणाचा खून, सेलू तालुक्यातील खैरी येथील घटना
सोशल मीडियावर विवाहितेचे अश्लील फोटो टाकल्याच्या रागातून तरुणाचा खून केल्याची घटना सेलू तालुक्यातील खैरी येथे घडली आहे.

परभणी : महिलेसोबतचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकल्याच्या रागातून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जिंतुर तालुक्यातील चारठाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरी येथे 12 मे रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हा खून विवाहितेच्या नातेवाईकांनी केलाय. तीन आरोपींविरोधात चारठाना पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चारठाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरी येथील एका विवाहित महिलेचे मागील काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील पिंपळवाडी येथील संतोष डिघोळे याच्यासोबत अनैतिक संबंध होते. काही दिवस दोघांचे एकमेकांसोबत चांगले जुळले. परंतु, काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये भांडणे झाली. यावरून आपल्या माहेरी असलेल्या महिलेला मृत व्यक्ती सतत त्रास देतोय. यातच मृत संतोष डिघोळे त्या महिलेसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करत होता. याचा राग अनावर झाल्यामुळे संगनमत करून आरोपी महिला शिल्पा घुगे, उद्धव घुगे, रंगनाथ घुगे यांनी मृत संतोष डिघोळे यास खैरी येथे बोलावून घेत लाठ्या काठया व दगडाने मारहाण करून जागेवरच खून केला.
याबाबत चारठाना पोलिसांना माहिती मिळताच साहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत जमादार पोऊनी आल्हापूरकर, पो कॉ राऊत, दंडगर, गाढवे, इघारे चालक भानुसे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पाटील हनुमंत दादाराव घुगे यांच्या फिर्यादीवरून गुरन 52/2021 नुसार कलम 302, 34 भांदवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत जमादार हे पुढील तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
