मानवत खून प्रकरणातील आरोपीचा मृतदेह सापडला; आत्महत्या की घातपात, पोलिसांसमोर मोठा पेच
Manvat Murder : टेम्पो चालकाची डोक्यात कुदळ घालून हत्या केल्यानंतर पसार झालेल्या आरोपीचा सात दिवसांनंतर मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

परभणी : जिल्ह्यातील मानवत येथे झालेल्या हत्या प्रकरणातील आरोपीचा मृतदेह सापडला असून ती आत्महत्या की घातपात असा पेच आता पोलिसांसमोर आहे. आरोपीने खून केल्यानंतर आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केली. मारोती चव्हाण असं मृत आरोपीचं नाव आहे.
परभणीच्या मानवत येथील 26 जुलै रोजी टेम्पो चालक ज्ञानेश्वर पवार यांची हत्या झाली होती. ही हत्या केल्यानंतर आरोपी पसार झाला होता. पोलिस त्याचा सर्वत्र शोध घेत होते. त्याच आरोपीचा मृतदेह आता मानवत शिवारातील एका शेतातील विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हा घातपात आहे की आत्महत्या आहे असा पेच पोलिसांसमोर आहे. या आरोपीने ज्ञानेश्वर पवार यांची हत्या केल्यानंतर आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Manvat Driver Murder Case : नेमकं काय झालं?
मानवत शहरातील कोक्कर कॉलनी भागात राहणाऱ्या टेम्पो चालक ज्ञानेश्वर पवार यांची 26 जुलै रोजी डोक्यात कुदळ मारून हत्या करण्यात आली होती. ही हत्या केल्यानंतर आरोपी मारोती चव्हाण हा फरार झाला होता. मागील सात दिवसापासून पोलिसांची विविध पथके या आरोपीचा शोध घेत होते.
शोध सुरू असतानाच मानवत शिवारातील आंबेगाव नाका परिसरातील एका विहिरीत आरोपी मारोती चव्हाण याचा याचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. हत्या केल्यानंतर आरोपीने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र तरीही या प्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत.
ही बातमी वाचा:























