एक्स्प्लोर

Parbhani : न्यायालयात रिपोर्ट सादर करण्यासाठी मागितली 1 लाखांची लाच, परभणीत PSI सह एकाला ACB च्या बेड्या

Parbhani Crime : परभणीच्या लाचलुचपत विभागाने कारवाई करत पोलीस उपनिरीक्षक गजानन जंत्रेच्या घराची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या घरात 74,500 रुपये सापडले. 

परभणी : वाळूचा पकडलेला ट्रक सोडवण्याकरिता न्यायालयात रिपोर्ट सादर करण्यासाठी लाच मागणाऱ्या आणि ती स्वीकारणाऱ्या या दोघांनाही परभणीच्या लाचलुचपत विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. रिपोर्ट सादर करण्यासाठी खासगी इसमाच्या माध्यमातून ही लाच मागण्यात आली होती. त्यापैकी 50 हजार स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. 

परभणीच्या मानवत पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गजानन जंत्रे याने 1 लाखांची लाच मागितली. तडजोडी अंती 70 हजार ठरले आणि त्यातील 50 हजार रुपये खाजगी इसमाद्वारे स्वीकारल्या प्रकरणी परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोघानांही पडकले. या प्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. 

मानवत पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक गजानन रामभाऊ जंत्रे आणि मानवत येथील खाजगी नोकरदार मंतशिर खान कबीर खान पठाण उर्फ बब्बुभाई यांनी तक्रारदाराकडून वाळूचे जप्त केलेले ट्रक सोडवण्याकरीता 1 लाख रूपयांची लाच मागितली होती. न्यायालयात ट्रक सोडविण्यासाठीचा अहवाल सादर करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक जंत्रे यांनी खाजगी इसमाकडे तडजोडीअंती 70 हजार रूपये देण्यास सांगितले. 

ठरलेल्या रकमेपैकी 50 हजार रूपये न्यायालयाच्या निकालाच्या आधी आणि 20 हजार रूपये निकालानंतर देण्याचे ठरले. सदरील बाब तक्रारदाराने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर एसीबीने सापळा रचून कारवाई केली. त्या सापळ्यात खाजगी इसम 50 हजार रूपये स्वीकारून पळून गेला. 

त्यानंतर मानवत शहरात लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मोठ्या शिताफीने दोघांनाही ताब्यात घेतले. मानवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया करण्यात आली. या कारवाईसाठी नांदेड परिक्षेत्राचे एसीबीचे पोलीस अधिक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर यांनी सापळा रचत कारवाई केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
Embed widget