एक्स्प्लोर

Crime News: बीडच्या पोलीस इन्स्पेक्टरच्या घरात सोन्याची बिस्किटं अन् चांदीच्या विटा, एसीबीच्या अधिकाऱ्यांचे डोळेही विस्फारले

Crime News: गुन्ह्यामध्ये आरोपी करण्याची भीती दाखवून पीआय खाडे यांनी या दोघांकडे 50 लाख, अशी एकूण एक कोटी रुपयांची लाच मागितली होती. अखेर 30 लाखात तडजोड झाली होती. हरिभाऊ खाडे यांच्याकडे सापडली लाखोंची संपत्ती

बीड: जिजाऊ मल्टिस्टेट सहकारी बँकेतील 100 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आरोपींच्या यादीत नाव समाविष्ट करण्याची भीती दाखवून व्यावसायिकांकडून लाच उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस निरीक्षकाने लाखो रुपयांची आर्थिक माया जमा केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे (Haribhau Khade) यांच्या घडावर धाड टाकली. त्यावेळी खाडे यांच्या घरात सोन्याची बिस्कीट, चांदीच्या विटा, सोन्याचे महागडे दागिने आणि नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली. ही सगळी संपत्ती पाहून एसीबीच्या अधिकाऱ्यांचेही डोळे विस्फारण्याची पाळी आली होती. 

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी हरिभाऊ खाडे यांच्या घराची झाडाझडती सुरु केली तेव्हा एक-एक करुन मुद्देमाल सापडत गेला. यावेळी एका बॅगेत 500 च्या नोटांची बंडलं आढळून आली. हे सर्व पैसे मोजण्यासाठी एसीबीच्या अधिकाऱ्यांना मशीनचा वापर करावा लागला. यावेळी खाडे यांच्या नावावर पाच ते सहा ठिकाणी असलेल्या मालमत्तांची कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागली आहेत. 

नेमकं प्रकरण काय?

बीड शहरातील जिजाऊ मल्टीस्टेट सहकारी बँकेमध्ये गेल्यावर्षी 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. याप्रकरणात बँकेचे प्रमुख  बबन शिंदे तसेच अध्यक्ष अनिता शिंदे यांच्यासह चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या हरिभाऊ खाडे यांच्याकडे होता. हा तपास सुरु असताना आरोपी बबन शिंदे यांनी दोन बांधकाम व्यावसायिकांना 60 लाख रुपये दिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने आपला मोर्चा या दोन व्यावसायिकांकडे वळवला होता. 

हरिभाऊ खाडे यांच्याकडे तपासाची सूत्रे होती. त्यांनी दोन्ही व्यावसायिकांना याप्रकरणात आरोपी करण्याची धमकी दिली. आरोपींच्या यादीत नाव येऊन द्यायचे नसेल तर दोघांनीही प्रत्येकी 50 लाख रुपये द्यावेत, असे खाडे यांनी सांगितले होते. चार महिने खाडे पैशांसाठी या दोघांच्या मागे लागले होते. अखेर या दोघांनी घासाघीस करुन प्रत्येकी 30 लाख रुपये देण्याचे कबूल केले. यानंतर एका व्यापाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता.  

पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्यासाठी व्यावसायिकाने पोलीस निरीक्षक खाडे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी खाडे पुण्यात होते. त्यांनी कुशल जैन या व्यापाऱ्याकडे 5 लाख रुपये दे, असे संबंधित व्यावसायिकाला सांगितले. त्यानुसार व्यावसायिकाने कुशल जैन याला पैसे दिले आणि एसीबीने त्याला अटक केली. एसीबीच्या या कारवाईनंतर पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे व सहाय्यक फौजदार रवीभुषण जाधवर हे दोघेही फरार झाले आहेत. 

आणखी वाचा

दहा दिवस पाळत नंतर टाकली धाड, मतदानाच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीसांच्या हाती लागलं मोठं घबाड

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Sandeep Kshirsagar: ‘सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी
'सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Embed widget