एक्स्प्लोर

Palghar : बोईसरमधील कंपनीत राडा; 19 पोलिस जखमी, 27 जणांना अटक

Palghar News : बोईसरमधील कंपनीत काल लेबर युनियनच्या स्थापनेवरून भीषण असा राडा झाला.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून जवळपास 27 पेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.

Palghar News : बोईसरमधील सर्वात मोठ्या असलेल्या विराज प्रोफाइल या कंपनीत काल लेबर युनियनच्या स्थापनेवरून भीषण असा राडा झाला. मुंबई लेबर युनियनच्या कर्मचाऱ्यांनी थेट कंपनीत शिरकाव करत कंपनीत तोडफोड सुरू केली.  त्यानंतर मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाही या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. या मारहाणीत 17 पोलिस कर्मचारी आणि दोन पोलिस अधिकारी जखमी झाले असून त्यांच्यावर बोईसर येथील तुंगा आणि टिमा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  या कंपनीच्या परिसराला सध्या पोलीस छावणीचं स्वरूप आलं आहे . 

बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीतील विराज प्रोफाइल या कंपनीतील युनियन स्थापनेचा वाद थेट हाणामारी, दगडफेक आणि लाठीचार्ज या वर जाऊन पोहोचला आहे. मागील दोन महिन्यांपासून मुंबई लेबर युनियन आणि स्थानिक विराज कंपनीतील युनियन यांच्या आस्थापनेवरून कंपनीत कामगारांचा वाद सुरू होता. हा वाद थेट न्यायालया पर्यंत पोहचला असून न्यायालयाकडून या प्रकरणात पुढील काही दिवस मुंबई लेबर युनियनच्या कामगारांना विराज कंपनी च्या आवारात जाण्यास बंदी घालण्यात आली होती. 

मात्र कंपनी काही कंत्राटी कामगारांना आतमध्ये घेऊन काम सुरू ठेवत असल्याची चाहूल कर्मचाऱ्यांना लागताच जवळपास तीनशे ते चारशे मुंबई लेबर युनियनच्या कामगारांनी थेट कंपनीच्या आत मध्ये शिरून राडा सुरू केला. या राड्यानंतर मदतीसाठी आलेल्या पोलिसांनाही मुंबई लेबर युनियनच्या कर्मचाऱ्यांनी दगडफेक करत मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाण आणि दगडफेकीत तब्बल 17 पोलीस कर्मचारी आणि दोन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर  बोईसरमधील टिमा आणि तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून जवळपास 27 पेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.

दगडफेक सुरू केल्यावर पोलिसांनी ही दुसऱ्या बाजूने लाठीचार्ज सुरू केला या लाठीचार्जमध्ये अनेक कामगारही जखमी झाले आहेत. बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीत विराज प्रोफाइल ही सर्वात मोठी कंपनी असून या कंपनीत जवळपास आठ ते दहा हजार कामगार काम करतात. येथील कामगारांनी मुंबई लेबर युनियन स्थापनेसाठी मागील दोन महिन्यांपासून काम बंद आंदोलन केलं होतं. मात्र या युनियनला कंपनी व्यवस्थापन आणि स्थानिक लेबर युनियनच्या कामगारांचा विरोध होता त्याच वादातून हा राडा झाल्याच आता उघड झालंय. या वादात कंपनी आणि परिसरात असलेल्या वाहनांचीही कामगारांकडून तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे आजही या कंपनी बाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात असून कंपनी आणि परिसराला पोलिस छावणीचं स्वरूप आले आहे. 

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pradeep Purnekar : ठाणेकरांच्या दबावानंतर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, आता त्यांना अटक कधी करणार? आदित्य ठाकेरेंचा सवाल
ठाणेकरांच्या दबावानंतर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, आता त्यांना अटक कधी करणार? आदित्य ठाकेरेंचा सवाल
Virar Crime News: बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
Hingoli Crime News: घरफोडीतील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर काठ्या, लोखंडी रॉडने हल्ला; डोळ्यांत मिरचीपूडही टाकली; हिंगोलीमधील धक्कादायक घटना
घरफोडीतील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर काठ्या, लोखंडी रॉडने हल्ला; डोळ्यांत मिरचीपूडही टाकली; हिंगोलीमधील धक्कादायक घटना
Pratap Sarnaik on Meenakshi Shinde: 'आरोप चुकीचे सिद्ध होईपर्यंत पदाचा राजीनामा...'; प्रताप सरनाईकांचं मिनाक्षी शिंदेंबाबत सूचक वक्तव्य, ठाण्यातील पत्रकार परिषदेत काय घडलं?
'आरोप चुकीचे सिद्ध होईपर्यंत पदाचा राजीनामा...'; प्रताप सरनाईकांचं मिनाक्षी शिंदेंबाबत सूचक वक्तव्य, ठाण्यातील पत्रकार परिषदेत काय घडलं?

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Hasan Mushrif on Satej Patil: सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
Meenakshi Shinde मोठी बातमी : मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, प्रदीप पूर्णेकर प्रकरणात चौकशीनंतर निर्णय
मोठी बातमी : मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, प्रदीप पूर्णेकर प्रकरणात चौकशीनंतर निर्णय
Pune Accident News: वाहनावरील नियंत्रण सुटलं अन्...; दुचाकीची वाहनाला जोरदार धडक, राजगुरुनगरमध्ये अपघातात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
वाहनावरील नियंत्रण सुटलं अन्...; दुचाकीची वाहनाला जोरदार धडक, राजगुरुनगरमध्ये अपघातात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
Embed widget