एक्स्प्लोर

NIA Arrests Terrorist : पाच लाखांचं बक्षीस असणारा खलिस्तानी दहशतवादी खानपुरियाला अटक, NIA ला मोठं यश

Kulwinderjit Singh Arrested : NIA कडून अटक करण्यात आलेला दहशतवादी कुलविंदरजीत सिंह अनेक दहशतवादी संघटनांशी संबंधित आहे. त्याला दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली.

NIA Arrested Khalistani Terrorist : राष्ट्रीय तपास यंत्रणेला ( NIA ) मोठं यश मिळालं आहे. एनआयएने दिल्ली विमानतळावरून फरार ( Most Wanted ) खलिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे. या खलिस्तानी दहशतवाद्यावर पाच लाख रुपयांचं बक्षीस होतं. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली आहे. कुलविंदरजीत सिंह ( Kulwinderjit Singh ) उर्फ ​​‘खानपुरिया’ ( Khanpuria ) असं अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला दहशतवादी कुलविंदरजीत सिंह बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) आणि खलिस्तान लिबरेशन फोर्स (KLF) या दहशतवादी संघटनांशी संबंधित आहे. त्याला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे.

अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील

राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, खानपुरियाचा पंजाबमध्ये अनेक हत्या आणि तसेच दहशतवादी प्रकरणांमध्ये सहभाग होता. तो 2019 पासून फरार होता. दहशतवादी खानपुरियावर राष्ट्रीय तपास यंत्रणांनी पाच लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. खानपुरिया शुक्रवारी बँकॉकहून भारतात आला. एनआयएला याची माहिती मिळताच त्याला दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली.

दिल्लीच्या सीपीमधील बॉम्बस्फोटातही हात

90 च्या दशकात नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरण तसेच अन्य राज्यांमध्ये ग्रेनेड हल्ल्यांमध्येही कुलविंदरजीत सिंहचा हात होता. अहवालानुसार, कुलविंदरजीत खानपुरिया हा पंजाबमधील डेरा सच्चा सौदाशी संबंधित आस्थापनांना तसेच पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा मास्टरमाईंड आहे. अनेक राज्यांचे पोलीस त्याच्या शोधात होते.


NIA Arrests Terrorist : पाच लाखांचं बक्षीस असणारा खलिस्तानी दहशतवादी खानपुरियाला अटक, NIA ला मोठं यश

देशात दहशत निर्माण करण्यासाठी योजना 

पंजाबसह संपूर्ण देशात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने कुलविंदरजीत सिंहने भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळ, चंदीगडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही लक्ष्य केलं. त्याने काही टार्गेट्सची रेकीही केली होती. याविरुद्ध 30 मे 2019 रोजी पोलीस स्टेशन स्टेट स्पेशल ऑपरेशन सेल (SSOC), अमृतसर येथे आणि त्यानंतर 27 जून 2019 रोजी NIA द्वारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या शोधात होते.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
Pune Dahi Handi : राधा पाटील पाठोपाठ निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 जणींवर गुन्हा; दहीहंडीतील अश्लील नृत्यावर पुणे पोलिसांचा बडगा
राधा पाटील पाठोपाठ निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 जणींवर गुन्हा; दहीहंडीतील अश्लील नृत्यावर पुणे पोलिसांचा बडगा

व्हिडीओ

Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
Pune DJ Ban : '...तर बापट यांनी ॲमेझॉनच्या जंगलात जावं', डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या प्रदीप नाईकांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
'...तर बापट यांनी ॲमेझॉनच्या जंगलात जावं', डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या प्रदीप नाईकांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
iPhone 18 Series Marathi News: 18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
Mumbai News: विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?
विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?
Rani Mukerji In Maharashtra State Film Awards: 'महाराष्ट्र माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग...'; राणी मुखर्जीच्या मराठमोळ्या अंदाजानं जिंकली मनं, भाषणाची सुरुवात मराठीतून करत भरभरुन बोलली... VIDEO
'महाराष्ट्र माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग...'; राणी मुखर्जीच्या मराठमोळ्या अंदाजानं जिंकली मनं, भाषणाची सुरुवात मराठीतून करत भरभरुन बोलली... VIDEO
Eknath Shinde Honoured Sith Commonwealth Public Leadership Award: ब्रिटिश संसदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौरव; 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन' पुरस्कार प्रदान, पाहा Photo
ब्रिटिश संसदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौरव; 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन' पुरस्कार प्रदान, पाहा Photo
iPhone Duo Marathi News: ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
iPhone 18 Pro 18 Pro Max And iPhone Duo Marathi News: ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती
ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती
Embed widget