एक्स्प्लोर

NEET Exam Peper Leak 2026 Shivraj Motegaonkar: 3 शब्दांचा पॅटर्न, 4 शब्दांची संकल्पना, देशभर स्वतंत्र ओळख; धडाधड नेटवर्क बनवले, आता NEET पेपरफुटी प्रकरणी अटक, कोण आहेत शिवराज मोटेगावकर?

NEET Exam Peper Leak 2026 Shivraj Motegaonkar: नीट पेपरफुटीप्रकरणी अखेर आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आली आहे.

NEET Exam Peper Leak 2026 Shivraj Motegaonkar: NEET पेपरफुटी प्रकरणाच्या (NEET Exam Peper Leak 2026) तपासादरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी अखेर आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकरला (Shivraj Motegaonkar) अटक करण्यात आली आहे. काल रात्री साडेसात वाजता शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आली मात्र आज सीबीआयकडून अटकेची घोषणा करण्यात आली. दरम्यान काल शिवराज मोटेगावकरची  सीबीआयकडून 11 तास चौकशी करण्यात आली. लातूर आणि पुणे येथील चौकशीनंतर शिवराज मोटेगावकरला काल अटक केली आहे.  तसंच शिवराज मोटेगावर यांच्या RCC क्लासमधे शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची आणि तिच्या वडिलांची देखील CBI कडून चौकशी करण्यात आली. शिवराज मोटेगावकर यांच्याकडून NEET चे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरे ज्यांना मिळाल्याचा संशय आहे ते विद्यार्थी आणि पालक देखील सीबीआयच्या रडारवर आहेत.

NEET आणि मेडिकल प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी RCC पॅटर्नची स्वतंत्र ओळख- (NEET Exam Peper Leak 2026 Shivraj Motegaonkar)

शिवराज मोटेगावकर हे महाराष्ट्रातील लातूर येथील प्रसिद्ध रसायनशास्त्र शिक्षक, मार्गदर्शक आणि RCC (Renukai Career Centre / Renukai Chemistry Classes) या कोचिंग संस्थेचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. त्यांनी 2003 मध्ये RCC ची स्थापना केली असून NEET, JEE आणि MHT-CET परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून महाराष्ट्रभर मोठे शैक्षणिक नेटवर्क उभे केले. “सर्व विषय एकाच छताखाली” ही संकल्पना राबवत विविध विषयांचे शिक्षक एकत्र करून RCC कोचिंग क्लासेसचा विस्तार केला. आक्रमक जाहिरातबाजी आणि ऑनलाईन शिक्षण मॉडेलमुळे RCC क्लासेसला राज्यासह देशभर ओळख मिळाली. NEET आणि मेडिकल प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी RCC पॅटर्नची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. दरवर्षी NEET निकालात RCC पॅटर्नमधील शेकडो विद्यार्थ्यांचे यश मिळत असल्याचा दावा केला जात होता. 

पेपर फुटीत मोटेगावकरने काय केले? (Shivraj Motegaonkar NEET Paper Leak)

  • शिवराज मोटेगावकर RCC कोचिंग क्लासचा संचालक
  • एनटीएशी निगडीत प्राध्यापकांशी मोटेगावकरचे संबंध
  • पी.व्ही.कुलकर्णीसोबत मोटेगावकरचे घनिष्ठ संबंध 
  • मोटेगावकरने परीक्षेपूर्वीच प्रश्न मिळवून उत्तरांसह मुलांपर्यंत पोचवले
  • मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये पेपरफुटीचे अनेक पुरावे 
  • सीबीआयकडून मोबाईलमधील डेटा, चॅट्स, कॉल रेकॉर्ड्सचा शोध सुरु

शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे- (Shivraj Motegaonkar NEET Paper Leak)

  • मोटेगावकर पेपर फोडणाऱ्या टोळीचा सक्रिय सदस्य
  • 3 मे रोजी परीक्षा झाल्यानंतर मोटेगावकरने नीट पेपर प्रश्न केले नष्ट
  • शिवराज मोटेगावकरबाबत सीबीआय तपासात आणखी एक धक्कादायक माहिती
  • तपासात नाव येऊ नये म्हणून मोटेगावकरने नष्ट केले पुरावे
  • 23 एप्रिल रोजी मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये होते पेपर
  • विद्यार्थ्यांना पेपर वाटल्यानंतर मोटेगावकरने पेपर केले "गायब"
  • नीटचे पेपर कोणाला दिले याबाबत मोटेगावकरने अद्याप सीबीआयला माहिती दिलेली नाही.

कोण आहेत शिवराज मोटेगावकर? (Who Is Shivraj Motegaonkar?)

  • एम.एस्सी. (केमिस्ट्री) शिक्षण स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडमधून पूर्ण.
  • लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील एका छोट्या गावात जन्म.
  • अतिशय सामान्य आणि गरीब शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी.
  • आई-वडील शेती व्यवसायाशी संबंधित.
  • महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच होम ट्युशन घेण्यास सुरुवात.
  • होम ट्युशनमधून मिळणाऱ्या पैशांवरच स्वतःचे शिक्षण पूर्ण केले.
  • लातूरमध्ये मोठ्या बहिणीकडे राहून शिक्षण घेतले.
  • उमरगा (जि. धाराशिव) तसेच लातूरमधील महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर केमिस्ट्री विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्य.
  • अध्यापनासोबत ‘रेणुकाई कोचिंग क्लासेस’च्या माध्यमातून खासगी शिकवणीची सुरुवात.
  • सुरुवातीला लातूरमध्ये स्वतंत्र केमिस्ट्री क्लास सुरू केला.
  • पुढे “सर्व विषय एकाच छताखाली” ही संकल्पना राबवत विविध विषयांचे शिक्षक एकत्र करून RCC कोचिंग क्लासेसचा विस्तार केला.
  • ‘RCC पॅटर्न’ विकसित करत महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये कोचिंग नेटवर्क उभारले.
  • मागील जवळपास 23 वर्षांपासून केमिस्ट्री विषयाचे खासगी मार्गदर्शन.
  • NEET आणि मेडिकल प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी RCC पॅटर्नची स्वतंत्र ओळख निर्माण.
  • दरवर्षी NEET निकालात RCC पॅटर्नमधील शेकडो विद्यार्थ्यांचे यश होत असल्याचा दावा.
  • RCC क्लासेसमध्ये हजारो विद्यार्थी प्रवेशित असल्याचे सांगितले जाते.
  • NEET परीक्षांमध्ये दरवर्षी अनेक प्रश्न जुळत असल्याचा दावा प्रा. मोटेगावकर वारंवार करत आले.
  • कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश.
  • स्वतःकडे असलेल्या तांत्रिक यंत्रणेचा वापर करून डिजिटल आणि ऑनलाईन शिक्षणाला गती दिली.
  • आक्रमक जाहिरातबाजी आणि ऑनलाईन शिक्षण मॉडेलमुळे RCC क्लासेसला राज्यभर ओळख मिळाली.
  • लातूर, नांदेड, संभाजीनगर आणि पुणे येथे RCC पॅटर्नचा विस्तार वाढला.
  • NEET 2026 परीक्षेत कथित ‘गेस पेपर’ जुळल्याच्या प्रकरणानंतर त्यांचे नाव चर्चेत आले.
  • या प्रकरणात Central Bureau of Investigation (CBI) कडून चौकशी आणि कारवाई सुरू आहे.

संबंधित बातमी:

मोठी बातमी! लातूरच्या शिवराज मोटेगावकरला अटक, लातूरमधील कार्यालयातही CBI पथकाची रेड, डिजिटल उपकरणे जप्त

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
Advertisement

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
Embed widget