Nashik Malegaon News : मालेगावला भरदिवसा साडेसात लाखांची चोरी, दुचाकीच्या डिक्कीतून पळवली रोकड
Nashik Malegaon News : शहरातील मोसम पूल चौक परिसरातील लोढा मार्केट व्यापारी संकुलात भरदिवसा साडे सात लाखांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
Nashik Malegaon News मालेगाव : शहर व परिसरात गेल्या काही दिवसात चोऱ्या, घरफोड्यांचे (Robbery) प्रमाण वाढले आहे. शहरातील मोसम पूल चौक परिसरातील लोढा मार्केट व्यापारी संकुलात (Lodha Market Vyapari Sankul) भरदिवसा साडे सात लाखांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेडीमेड कपड्यांच्या दुकानात खादेसाठी आलेल्या तरुणाच्या दुचाकीच्या डिक्कीतून दोन चोरट्यांनी चोरी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेखर देवराम पवार (Shekhar Pawar) (28, रा. तळवाडे, ता. मालेगाव) हा तरुण मका व शेतमाल विक्रीतून बँकेत (Bank) आलेले पैसे काढण्यासाठी आला होता. शेखरने अॅक्सिस बँकेतून 7 लाख 80 हजार रुपये कडून आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवले.
डिक्की खोलून सात लाख लंपास
बँकेतून शेखर कामानिमित्त सोयगाव नववसाहत भागात गेला. तेथून तो लोढा मार्केट व्यापारी संकुलातील किर्ती ड्रेसेसमध्ये मुलांचे कपडे खरेदीसाठी आला. या दुकानासमोर दुचाकी लावली असताना तो दुकानात असल्याची संधी साधून दोघा चोरट्यांनी दुचाकीची डिक्की खोलून ही रक्कम लंपास केली. काही वेळानंतर हा प्रकार शेखरच्या लक्षात आला.
चोरटे सीसीटीव्हीत कैद
घटनेनंतर शेखर बँकेसह जेथे जेथे गेला तेथे रक्कम शोधत फिरला. मात्र त्याला काही हाती लागले नाही. त्यानंतर शेखर याने छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शेखरच्या पोलिसांनी घटनास्थळी जात शोध घेतला. लोध मार्केटमधील सीसीटीव्ही त्यांनी पाहिले असता दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले. छावणी पोलीस या दोन्ही चोरट्यांचा शोध घेत आहेत.
नाशिकमध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडले
वडाळा पाथर्डी मार्गावर पती समवेत दुचाकीवर ट्रिपलसिट प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दीड लाखाचे मंगळसूत्र मोटारसायकलस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिला दिलीप कदम (रा.सोमठाणदेश ता.येवला) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
कदम या पतीसमवेत नाशिक शहरात आल्या होत्या. सराफ लॉन्सकडून कदम दाम्पत्य पाथर्डी गावाच्या दिशेने प्रवास करीत असताना पार्कसाईट सोसायटी समोर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी कदम यांच्या गळ्यातील सुमारे 1 लाख 40 हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. पुढील तपास उपनिरीक्षक सोनार करीत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Paytm ED Probe : पेटीएमच्या अडचणी वाढणार? आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडी चौकशीची टांगती तलवार