खळबळजनक... नाशिकच्या हायफाय सोसायटीत आठ महिन्यांपासून देह विक्री, परिस्थिती पाहून पोलिसांनाही बसला धक्का
Nashik Crime News : नाशिकच्या हायफाय सोसायटीत गेल्या आठ महिन्यांपासून देह विक्री सुरु होती. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
![खळबळजनक... नाशिकच्या हायफाय सोसायटीत आठ महिन्यांपासून देह विक्री, परिस्थिती पाहून पोलिसांनाही बसला धक्का Nashik Crime Police arrested women who running sex workers racket in society at Adgaon Naka area Maharashtra Politics खळबळजनक... नाशिकच्या हायफाय सोसायटीत आठ महिन्यांपासून देह विक्री, परिस्थिती पाहून पोलिसांनाही बसला धक्का](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/05/29362a4180958b4a51ad972faa15f6751725525744237923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik Crime News : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आडगाव नाका (Adgaon Naka) परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत गेल्या काही महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरु होता. वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेच्या दादागिरीमुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले होते. आता पोलिसांनी (Police) या प्रकरणी मोठी कारवाई केली असून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेस पोलिसांनी जेरबंद केले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक शहरातील आडगाव नाका परिसरात हा अत्यंत वर्दळीचा परिसर मानला जातो. याच परिसरातील उच्चभ्रू सोसायटी नक्षत्र अपार्टमेंट (Nakshatra Apartment) येथे दिल्या आठ ते दहा महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरू होता.
गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून भर वस्तीत वेश्या व्यवसाय
नाशिक शहर पोलिसांनी काल सायंकाळी या सोसायटीत छापा टाकून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या एका महिलेस आणि इतर संशयतांना ताब्यात घेतले आहे. गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून भर वस्तीत सर्रासपणे वेश्या व्यवसाय सुरू असल्यामुळे स्थानिक नागरिक देखील सावटाखाली होते. अखेर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात (Adgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)