निवृत्त मुख्याध्यापकाकडून दिव्यांग महिलेसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, नाशकातील गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच संतापजनक प्रकार
Nashik Crime : नाशकातील पंचायत समिती कार्यालयात संतापजनक प्रकार घडलाय. नाशिक पंचायत समितीमध्ये निवृत्त मुख्याध्यापकाकडून दिव्यांग कर्मचारी महिलेसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
Nashik Crime : नाशकातील पंचायत समिती कार्यालयात संतापजनक प्रकार घडलाय. नाशिक पंचायत समितीमध्ये निवृत्त मुख्याध्यापकाकडून दिव्यांग कर्मचारी महिलेसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच केला निवृत्त मुख्याध्यापकाने प्रकार घडलाय. त्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येतोय.
गटशिक्षणाधिकारी कार्यालयात ठाण मांडून कारवाई करण्याची मागणी
कार्यालयातील कपाटाच्या आड दिव्यांग महिलेच्या हतबलतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न निवृत्त मुख्याध्यापकाकडून करण्यात आलाय. संशयिताला सोडून देण्यात आल्याने कर्मचारी संतप्त झाले आहेत. कर्मचारी आक्रमक झाल्याने पंचायत समितीत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. कर्मचाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात ठाण मांडून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महिलाराज असताना महिलेला न्याय मिळत नसल्याने नाराजी
विशेष म्हणजे या कार्यालयात सर्व महिलाराज असताना महिलेला न्याय मिळत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महिलेच्या तक्रारीवरून नाशिकच्या सरकारवाडा बुधवारी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. संशयित आरोपी फरार असून सरकारवाडा पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू सुरु आहे.
बदलापूरनंतर भिवंडीतील महानगरपालिकेच्या शाळेत एका शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग
काही दिवसांपूर्वीच बदलापुरात चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर सातत्याने महिला अत्याचाराचे प्रकार समोर येत आहेत. भिवंडीतील महानगरपालिकेच्या शाळेत एका शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना समोर आलीये. या शिक्षकाने विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवल्या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शांतीनगर पोलिसांनी शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. मुइझम्मील हुसेन शबीर अहमद शेख (वय 36) असं अटक करण्यात आलेल्या शिक्षक आरोपीचे नाव आहे.
इतर महत्वाच्या बातम्या