एक्स्प्लोर

Nashik Crime News : बनावट बंदुकीच्या भितीनं लुटण्याचा प्रयत्न; पालकमंत्री भुसेंनी पकडला चोर

Nashik Crime News : एका चोरट्याने बनावट बंदुकीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न केला. पण पालकमंत्री दादा भुसे यांच्या समयसूचकतेमुळे दरोडे खोरास अटक करण्यात यश आलं आहे.

Nashik Crime News : मालेगाव बाह्यचे आमदार पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या समयसूचकतेमुळे दरोडेखोरास दरोडा टाकण्याआधीच जेल हवा खावी लागली आहे. यामुळे भुसे यांच्या समयसूचकतेला दाद दिली जात आहे. मालेगाव शहरातील (Malegaon News) कलेक्टर पट्टा भागातील बंगल्यात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोराला पकडण्यात यश आले आहे. 

मालेगाव शहरातील कलेकटर पट्टा भागातील बंगल्यात ही घटना घडली. चोरट्याने बनावट बंदुकीचा धाक दाखवत (Showing The Fear of Gun) दागिने आणि पैशांची मागणी करत महिलेवर धारदार कैचीने तर मुलीस चावा घेतला. या घटनेने हादरलेल्या दोघा मुलींनी घराबाहेर धाव घेऊन आरडाओरड करत पळवून लावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु दरोडेखोराने पळवून न जाता महिलांना बंदुकीचा धाक दाखवत दागिने आणि पैसे काढून देण्याची मागणी केली. याच भागातून जाणारे पालकमंत्री दादा भूसे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ बंगल्यात शिरून दरोडेखोराला पकडुन मालेगाव पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. 

मालेगाव शहरातील ऑटोमोबाईल स्पेअरपार्ट विक्रेते मितेश विनोद दोशी यांचा जैन स्थानकच्या पाठीमागे बंगल्यात दुपारच्या सुमारास दुकानातून एक मॅकेनिक बंगल्यावर पोहोचून दरवाजा वाजवला. मुलीने दरवाजा उघडला असता पप्पांनी पाठवले आहे, असे त्याने सांगितले. म्हणून त्याला घरात प्रवेश देण्यात आला. पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावून दागिने आणि रोकड काढण्यास सांगितले. घरातील सदस्यांनी आरडाओरड करताच परिसरातील रहिवासी बंगल्याकडे धावून आल्याने चोरट्याने पळून जाऊन दरवाजा लावून घेतला.

टेरेसवरून चोरटा खाली येत नसल्याने अग्निशमन दलाचे अधीक्षक संजय पवार यांच्यासह जवानांना पाचारण करण्यात आले होते. बंगल्याच्या बाहेर संतप्त जमाव जमल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत दादा भुसे यांनी शेजारच्या बंगल्याच्या टेरेसवर जाऊन 'तुला कुणी मारणार नाही, पोलिसांच्या स्वाधीन होऊन जा, अशी ग्वाही दिल्याने चोरटा खाली आला. त्यास मालेगाव पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. मंत्री दादा भुसे यांच्या समयसूचकतेमुळे दरोडेखोरांना पकडण्यात यश आल्याने भुसे यांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. 

मालेगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यात एक चारचाकी वाहन, सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी गेल्या आहेत अशा घटना वारंवार घडत आहे. पकडलेल्या दरोडेखोरास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Mumbai Crime: दिवाळीत फटाके फोडण्यावरून वाद, अल्पवयीन मुलांनी केली तरूणाची हत्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 30 Sep 2024 : 09 PM : ABP MajhaTop 25 : टॉप 25 न्यूज : 07 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaAjit Pawar VS Sharad Pawar : पुतण्याचे नेते काकांच्या भेटीला, 'डर का माहोल' कुणाकडे? Special ReportVare Nivadnukiche Superfast News 07 PM: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे: 30 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
Ind vs Ban: कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
Embed widget