एक्स्प्लोर

पायात जोडवे, हातात बांगड्या, अर्धवट जळालेल्या मृतदेहामुळे एकच खळबळ; शेताच्या बांधावर भीषण कृत्य!

नांदेडमध्ये एका शेतात अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. लवकरच या घटनेमागे कोण आहे, हे समोर येण्याची शक्यता आहे.

नांदेड : माहूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.माहूर ते किनवट या राष्ट्रीय महामार्गावरील एका शेतात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. हिवळणी येथील तुलसीराम राठोड यांच्या शेताच्या धुऱ्यावर (बांधावर) हा मृतदेह आढळला आहे. या घटनेने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. 

नेमका प्रकार काय? 

 नांदेड जिल्ह्यातील हिळवणी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात एका अज्ञात महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. शेतातीलच लाकुडफाटा घेऊन हा मृतदेह जाळल्याचा प्रयत्न करण्यात आलाय. 5 जूनच्या रात्रीच ही घटना समोर आली आहे. माहूर -किनवट या राष्ट्रीय महामार्गाशेजारी तुळशीराम राठोड यांचे शेत आहे.या शेतात रात्री  मोठ्या प्रमाणात आग दिसल्याने राठोड हे शेताकडे आले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. सर्व आग विझल्यावर त्या ठिकाणी अज्ञात महिला जळालेल्या अवस्थेत दिसल्याने त्यानी माहूर पोलीसांना माहिती दिली.   

बांगड्या, जोडव्यांशिवाय अन्य पुरावा आढळला नाही

या घटनेची माहिती होताच घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेत घेतली. घटनास्थळाची पोलिसांनी माहिती घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत महिलेच्या हातात बांगड्या आणि पायात जोडवे दिसून आले आहेत. या व्यतिरिक्त तिची ओळख पटण्यासारखा कुठलाही पुरावा तेथे आढळून आलेला नाही. या महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलीस तपास करीत आहेत. हा घातपात होता की आत्महत्या याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, या गटनेमुळे सध्या  हिळवणी या गावात तणावाची स्थिती आहे. पोलीस लवकरच या प्रकरणाच्या मुळाशी जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

कुजलेल्या स्थितीत आढळले दोन मृतदेह

दरम्यान, काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर आणि मालेगाव तालुक्यातील काटेपूर्णा जंगलातही अशीच धक्कादायक घटना घडली. 27 मे 2024 रोजी या जंगलाच वेगवेगळ्या ठिकाणी दोन कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळले होते. या मृतदेहांचा फक्त हाडाचा सापळा शिल्लक राहिलेला होता. यातील एक मृतदेह हा मंगळुरपीर तालुक्यातील जमुना खुर्द येथील 36 वर्षीय विठ्ठल खुळे यांचा होात. दोन महिन्यांपूर्वी घरगुती वादामुळे ते घरातून बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.   

हेही वाचा :

Mumbai Crime News : मुंबई एअरपोर्टवरील अधिकारी चक्रावले; प्रवाशाच्या गुदद्वारातून बाहेर काढलं लाखोंचं सोनं, पाहा फोटो

28 हजारांची लाच घेताना पकडलं,पाटबंधारे खात्याच्या इंजिनिअरकडे दोन किलो सोन्यासह 1.61 कोटीचं घबाड सापडलं!

अनैतिक संबंधातून भाच्यानं मामीला संपवलं, स्प्रे आणि मतदार यादीवरुन प्रकरणाचा छडा; आरोपीला दिल्लीतून अटक

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget