एक्स्प्लोर

Khalistani Terrorist Harvinder Singh Rinda : खलिस्तानी दहशतवादी रिंदानंच तेलंगणामध्ये RDX पाठवलं

Maharashtra News : खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंदानंच तेलंगणामध्ये स्लीपर सेलच्या मदतीनं आरडीएक्स पाठवलं, सूत्रांची एबीपी माझाला धक्कादायक माहिती

Maharashtra News : खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंदानंच (Harvinder Singh Rinda) तेलंगणामध्ये आरडीएक्स पाठवलं असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. स्लीपर सेलच्या मदतीनं हरविंदर सिंह रिंदा यानं आरडीएक्स पाठवलं असल्याची माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. हे आरडीएक्स नांदेडमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती सुरुवातीला होती, पण ताज्या माहितीनुसार, हे आरडीएक्स तेलंगणामध्ये पाठवण्यात आलं होतं. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण 5 ते 6 महिन्यांपूर्वी मुंबईला इनपुट मिळालं होतं. त्यानुसार, मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणलं जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. हा अलर्ट हरविंदर सिंह रिंदा याच्यासंदर्भातच होता. त्यामुळे नांदेडमध्ये सापडलेलं आरडीएक्स हे मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंदानंच नांदेडमधील लोकांकडून जवळपास 200 कोटींची वसुली केली आहे. या पैशांचा उपयोग तो दहशतवादी कारवायांसाठी करणार असल्याचंही सुत्रांनी सांगितलं आहे. सध्या रिंदा पाकिस्तानातील इस्लामाबाद शहरात असून यापूर्वी तो लाहोरमध्ये होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील बस्तारा जिल्ह्यातून 4 दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आणि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर, महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले आहेत. महाराष्ट्र पोलीस दहशतवाद्यांच्या पूर्वीच्या आरडीएक्सच्या खेपेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या कथित मानवी स्फोटामागे हरविंदर सिंह रिंदाचाच हात असल्याचं लुधियाना येथील न्यायालयाकडून सांगण्यात येत आहे, त्यादरम्यान रिंदानं स्फोटापूर्वी संशयितांशी चार संभाषणं केली असल्याचंही समोर आलं आहे.  

दरम्यान, हरियाणात अटक करण्यात आलेल्या चार अतिरेक्यांचा म्होरक्या हरविंदर सिंग रिंदा याच्या नांदेडमधील साथीदारांच्या घरी धाडसत्र सुरू करण्यात आलं आहे. नांदेड पोलीस दलाचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या आदेशानुसार, संशयितांच्या घरी झडतीची मोहीम राबवली जात आहे. काल हरियाणातील कर्नाल चेक पोस्टवर चार अतिरेक्यांना अटक केली होती. यावेळी चौघांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठी जप्त करण्यात आला होता. नांदेड आणि आदीलाबादमध्ये मोठा घातपात करण्याचा कट असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget