Nanded: खिचडी खाल्ल्याच्या क्षुल्लक कारणावरून एकाचा खून; पिता पुत्रावर गुन्हा दाखल
Nanded: नांदेड शहरात खिचडी खाल्ल्याच्या क्षुल्लक कारणावरून एकाचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
Nanded: नांदेड शहरात खिचडी खाल्ल्याच्या क्षुल्लक कारणावरून एकाचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नांदेड शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरातील विणकर कॉलनीमध्ये खिचडी खाणे एकाच्या जीवावर बेतलं आहे. कारण खिचडी खाण्यावरून एका तरुणाचा पिता पुत्रांनीच निर्घृण खून केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी आरोपी बाप लेकाला अटक करून न्यायालयासमोर हजर केलेय.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड तालुक्यातील धनेगाव जवळ असलेल्या शासकीय दूध डेअरी चौकातील विणकर कॉलनी भागात राहणाऱ्या योगेश विलास गिरी (वय 26) हा व शिवलिंग व्यंकटराव गायंकी (वय 45) हे दोघेजण देगाव (येळेगाव कारखाना ता. अर्धापूर) येथे कामासाठी गेले होते. दरम्यान, आपले काम आटोपून हे दोघेजण भोकरफाटा मार्गे नांदेड येथे घरी पोहचले. यात योगेश गिरी याने येळेगाव कारखान्याहून परतत असताना. भोकरफाटा या ठिकाणाहून खिचडी पार्सल घेतली. परंतु सदर खिचडीचे हे पार्सल ते शिवलिंग गायंकी याच्या घरी विसरले. त्या दरम्यान शिवलिंगच्या घरच्यांनी सदर खिचडी पार्सल उघडले व त्यातील खिचडी खाल्ली. पण थोड्या वेळाने सदर खिचडीचे पार्सल घेण्यासाठी योगेश गिरी हा शिवलिंगच्या घरी आला. त्या दरम्यान खिचडीचे पार्सल शिवलिंग याने उघडल्याचे व नंतर खाल्ल्याचे त्याला लक्षात आले. त्यावरून शिवलिंग व योगेश यांच्यात मोठा वाद झाला. ज्यात यावेळी शिवलिंग गायंकी आणि त्याचा मुलगा प्रियदर्शन गायंकी या दोघांनी घरी आलेल्या योगेश गिरी यास लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. ज्यात योगेश गिरीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दरम्यान, याप्रकरणी मयत योगेश गिरीची आई शोभाबाई विलास गिरी यांच्या फिर्यादीवरून 30 मार्च रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात शिवलिंग गायंकी आणि प्रियदर्शन गायंकीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.
महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
