Extortion Case: अंगडिया व्यवसायिकांनी मला लाच देण्याचे आमिष दाखवले, त्रिपाठी यांनी अधिकाऱ्यांना दिले पुरावे
Saurabh Tripathi: अंगडिया व्यापाऱ्यांकडून पैसे उकळल्याचा आरोप असलेले मुंबई पोलिसांचे डीसीपी सौरभ त्रिपाठी यांना मंगळवारी महाराष्ट्र गृह विभागाने निलंबित केले.

Saurabh Tripathi: अंगडिया व्यवसायिकांकडून पैसे उकळल्याचा आरोप असलेले मुंबई पोलिसांचे डीसीपी सौरभ त्रिपाठी यांना मंगळवारी महाराष्ट्र गृह विभागाने निलंबित केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ त्रिपाठी यांनी त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या प्राथमिक तपासादरम्यान एक ऑडिओ रेकॉर्डिंग असलेले पेन ड्राईव्ह तपास अधिकाऱ्यांना सुपूर्द केले होते. ज्यामध्ये अंगडिया व्यापारी त्यांना भेटण्यासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी त्रिपाठी यांना आपल्याविरोधात कोणतीही कारवाई करू नये, म्हणून त्यांना लाच देण्याचे आमिष दाखवल्याचे बोललं जात आहे.
या प्रकरणाचा तपास करणार्या गुन्हे शाखेला संशय आहे की, त्रिपाठी यांनी पेन ड्राइव्हमध्ये दिलेले ऑडिओ रेकॉर्डिंग टेम्पर केले असावे. गुन्हे शाखेला असेही आढळून आले की, त्रिपाठी यांनी कथितपणे एलटी मार्गाच्या पोलीस अधिकार्यांना अंगडिया व्यावसायिकांवर छापे टाकण्यास सांगितले, जेणेकरून ते अंगडियावर दबाव आणू शकतील आणि त्यांच्याकडून महिन्याला 10 लाख रुपये वसूल शकतील.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरिक्त आयुक्त (दक्षिण विभाग) दिलीप सावंत यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीदरम्यान, त्रिपाठी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. कारण अंगडिया व्यवसायिकांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती की, ते त्यांच्याकडून दरमहा 10 लाख रुपयांची मागणी करत होते.
सावंत यांच्यासमोर आपली बाजू मांडताना त्रिपाठी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी आपल्या बचावात एक ऑडिओ रेकॉर्डिंग दिली सावंत यांना दिली. ज्याद्वारे त्यांना अंगडियांचा गट आपल्याला भेटला होता. तसेच त्यांच्या क्षेत्रात येणाऱ्या अंगडिया व्यावसायिकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये, म्हणून दरमहिन्याला लाच देण्याची ऑफर केली होती, हे सिद्ध करता यावे.
या प्रकरणी त्रिपाठी यांनी दिलेली ऑडिओ रेकॉर्डिंग टेम्परिंग केली असावी किंवा ती स्क्रिप्टनुसार बनवण्यात आली असावी, असे गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले. जेणेकरून या आधारावर त्रिपाठी स्वतःचा बचाव करू शकतील. त्यामुळे फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेण्याचा विचार गुन्हे शाखा करत आहे. जेणेकरून या ऑडिओ रेकॉर्डिंगची सत्यता तपासता येईल.
याच दरम्यान आंगडिया व्यवसायिकांनीही या संबंधित एक ऑडिओ क्लिप मुंबई पोलिसांकडे दिली होती. ज्यामध्ये त्रिपाठी अंगडिया व्यावसायिकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच त्यांच्याविरोधात तक्रार मागे घेण्यास सांगत आहेत.
दरम्यान, अंगडियाकडून वसुली प्रकरणात गुन्हे शाखेने आतापर्यंत एकूण 4 आरोपींना अटक केली असून त्यापैकी 3 पोलीस अधिकारी आहेत. याच दरम्यान अटकेनंतर पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांची झालेल्या पोलीस चौकशीतून सौरभ त्रिपाठी यांचे नाव बाहेर आले. त्यानंतर सौरभ त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी (22 मार्च) त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
संबधित बातमी:
Extortion Case: वसुली प्रकरणी IPS अधिकारी सौरभ त्रिपाठी निलंबित, जामीन याचिकेवर 23 मार्चला सुनावणी























