Nagpur : सामूहिक बलात्कार प्रकरणी तीन धक्कादायक खुलासे, पीडितेवर या आधीही अत्याचार झाल्याचं समोर
नागपूरच्या सामूहिक बलात्कार प्रकरणी धक्कादायक खुलासे होत असून या प्रकरणात सातव्या आरोपीचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
नागपूर : शहरात गुरुवारी रात्री 17 वर्षीय गतिमंद मुलीवर एकाच रात्रीत घडलेल्या दोन सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात एकानंतर एक असे धक्कादायक खुलासे होत आहे. या धक्कादायक प्रकरणात पोलीस तपासात तीन महत्वाच्या बाबी समोर आल्या असून या प्रकरणात सातव्या आरोपीचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच या पीडित मुलीसोबत 2019 मध्ये ही बलात्काराची एक घटना घडली होती असंही समोर आलं आहे.
या प्रकरणातील सातव्या आरोपीने पीडितेवर बलात्कार करणाऱ्या पहिल्या टोळीला खोली उपलब्ध करून दिली होती. तसेच आरोपींना त्या खोलीत दारू आणि इतर साहित्य आणून दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलीस तपासात पुढे आलेली दुसरी धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलीसोबत 2019 मध्ये ही बलात्काराची एक घटना घडली होती. तेव्हा ही पीडित मुली आपले घर सोडून मनमाडला निघून गेली होती. तेव्हा मनमाड मधील एका ऑटो चालकाने तिच्यावर बलात्कार केला होता.
पोलीस तपासात पुढे आलेली तिसरी धक्कादायक बाब म्हणजे काल पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करताना डॉक्टरांना तिच्या हातात सूज असल्याचे दिसून आले होते. तिच्या हाताचे एक्सरे काढल्यावर हातात आठ टाचण्या खोलवर टोचलेल्या आढळल्या. त्यानंतर डॉक्टर्सनी छोटी शस्त्रक्रिया करून सर्व टाचण्या बाहेर काढल्या आहेत. त्यानंतर पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांकडून मिळाल्या माहितीप्रमाणे त्या टाचण्या पीडितेनेच स्वतःच्या हातात टोचल्या होत्या. मात्र, तिने हा अघोरी प्रकार का केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर केले की त्याच्या आधी केले हे अजून स्पष्ट नाही.
काय आहे प्रकरण?
नागपूरमध्ये राहणारी एक गतिमंद मुलगी गुरुवारी रात्री तिच्या घरातून निघून गेली होती. रात्रीच्या वेळी ती रेल्वे स्टेशन जवळच्या मानस चौकात आली. तिला नाशिकच्या दिशेने जायचे होते. मात्र, तिच्याकडे तिकीटाचे पैसे आणि तिथे कसे जायचे याबद्दल माहिती नव्हती. मानस चौकात लोखंडी पुलाजवळ अज्ञात टवाळखोर तिची छेड काढत असताना, तिला एका ऑटो चालकाने मी मदत करतो असे खोटे सांगून आपल्या मोमीनपुरा परिसरातल्या रूमवर नेले. तिथे आपल्या इतर ऑटो चालक मित्र आणि रेल्वे स्टेशनवर कुली म्हणून काम करणाऱ्या तीन मित्रांना बोलावले. त्या रूममध्ये चौघांनी तिच्यावर रात्री आळीपाळीने बलात्कार केला. शुक्रवारी पहाटे चार आरोपींपैकी एकाने पीडितेला मोमीनपुरापासून जवळच असलेल्या मेयो रुग्णालयाच्या समोर सोडून दिले.
त्या ठिकाणी सोडून जाणाऱ्या आरोपीने आधीच तिथे असलेल्या इतर दोन आरोपींकडे (पाचवा आणि सहावा आरोपी) सोपवून दिले. त्या दोघांनी तिथे एका उभ्या असलेल्या ऑटोत नेऊन पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. शुक्रवारी सकाळी उजाडल्यावर ती मुलगी रस्त्यावरून जाणाऱ्या काही जणांना दिसली. तेव्हा मुलीने तिला नाशि ला जायचे होते एवढेच सांगितले. त्यामुळे त्या लोकांनी तिला नागपूर रेल्वे स्थानकावर सोडले आणि तिकीटही घेऊन दिलं. (रेल्वे स्टेशनवर सोडणाऱ्यांना तिच्यासोबत रात्री काय झालं याची काहीच कल्पना नव्हती).
महत्वाच्या बातम्या :