एक्स्प्लोर

Nagpur Accident : भरधाव कारने महिलेले उडवले, नंतर बेदरकारपणे फरफटतही नेलं; दोषी मात्र तीन आठवड्यानंतरही मोकाटच! 

Nagpur : नागपूरमध्ये एक निर्दोष महिला आपल्या मैत्रिणीसोबत मॉर्निंग वॉक करायला निघाली असता या महिलेला एक कारने बेदरकारपणे अक्षरक्ष: उडवलं सोबतच चाकाखाली दोनदा अमानुषपणे चिरडल्याची घटना घडलीय.

Nagpur Accident News नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूर हे सर्वार्थानं सुरक्षित असे शहर असल्याचे सांगण्यात येतं. इथल्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांची करडी नजर असून शहरात हजारो कॅमेऱ्यांनी सज्ज आहे. मात्र, याच स्मार्ट सिटी नागपूरमध्ये (Nagpur) एक निर्दोष महिला आपल्या मैत्रिणीसोबत मॉर्निंग वॉक करायला निघाली असता या महिलेला एक कारने बेदरकारपणे अक्षरक्ष: उडवलं. त्यानंतर ही कार इथवरच थांबली नाही तर नंतर तिला कारच्या चाकाखाली दोनदा अमानुषपणे चिरडलेही.7 मे ला सकाळच्या सुमारास ही थरारक घटना घडली.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या ममता आदमने यांना चिरडणाऱ्या कार आणि या कार चालकाचा शोध लावण्यात मात्र पोलीस (Nagpur Police) तीन आठवड्यानंतर ही अपयशी ठरले आहेत. या अपघातात ममता आदमने यांचे अनेक हाड फ्रॅक्चर झाले असून अद्याप त्या अंथरुणावरच पडून आहेत. या घटनेमुळे स्मार्ट सिटी नागपूरातील सुरक्षेसाठी लावलेले कॅमेरे परत एकदा कूचकामी ठरल्याचे यातून निष्पन्न झाले आहे. 

दोषी तीन आठवड्यानंतरही मोकाटच! 

ही घटना आहे 7 मे च्या सकाळी 6:30 वाजताची. गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत शारदा चौक जवळ ममता आदमने आपल्या मैत्रिणीसह मॉर्निंग वॉकला निघाल्या होत्या. दरम्यान, अचानक पाठीमागून एक पांढऱ्या रंगाची कार आली आणि तिने दोघींना जोरदार धडक दिली. यात ममता यांची मैत्रीण कारच्या धक्क्याने बाजूला फेकली गेली. तर ममता यांना कारच्या बोनटची जोरदार धडक लागल्यामुळे त्या समोरच्या दिशेने अनेक फूट लांब फेकल्या गेल्या आणि परत त्याच कार ने ममता आदमने यांना दोनदा चिरडले. या अपघातानंतर बेजबाबदार कारचालक तिथून लगेच पळून गेला. 

अद्याप अंथरुणाला खिळून

अपघातात गंभीर जखमी झालेल्या ममता आदमने यांना टप्प्याटप्प्याने दोन वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या शरीराच्या अनेक हाड या अपघातात तुटल्या. त्यानंतर अनेक शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी ममता आदमने यांचा जीव तर वाचवलाय. मात्र प्रचंड वेदनेत ममता आदमने सध्याही अंथरुणाला खिळून आहेत. डॉक्टरांच्या मते पुढील तीन महिने त्या आपल्या पायावर उभे राहू शकणार नाही आणि चालूही शकणार नाहीयेत. त्यानंतर पुन्हा सामान्य जीवन जगण्यासाठी त्यांना अनेक महिने वाट पाहावी लागणार आहे.

शारीरिकपेक्षा मानसिक वेदनाच जास्त

मात्र, ममता आदमने यांची शारीरिक वेदना कमी असून मानसिक वेदनाच जास्त आहे. कारण उपराजधानी नागपूरचे पोलीस आजवर त्या दोषी कार चालकाला शोधू शकले नाही. 7 मे च्या या अपघाताला आता तीन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. मात्र, अजूनही नागपूर पोलीस आणि पोलीस स्टेशनचे पथक दोषी कारच्या चालकाला शोधण्यात यशस्वी झालेले नाही. परिणामी, या प्रकरणाची विचारणा केली असता आमची चौकशी सुरू आहे, कार चालकाचा शोध सुरू आहे. एवढंच पोलिसांचा उत्तर आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळेUddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 02 PM 20 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल   
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
Embed widget