Nagpur Crime :आधी दारू प्यायला एकत्र बसले, नंतर किरकोळ वाद विकोपाला; सहकाऱ्यानेच युवकाला संपवलं, नागपूर हादरलं
Nagpur Crime News : नागपूरच्या सक्करदरा पोलीस स्टेशन हद्दीतील सोमवारी क्वार्टर परिसरातून एक हत्येचे प्रकरण समोर आले आहे. यात कार्तिक चौबे नामक एका गुंड प्रवृत्तीच्या युवकाची हत्या करण्यात आली आहे.

Nagpur Crime News : नागपूरच्या सक्करदरा पोलीस स्टेशन हद्दीतील सोमवारी क्वार्टर परिसरातून एक हत्येचे प्रकरण समोर आले आहे. यात कार्तिक चौबे नामक एका गुंड प्रवृत्तीच्या युवकाची हत्या करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, क्षुल्लक कारणावरून त्याच्या सोबत असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या इतर लोकांनीच त्याची हत्या केली आहे. महत्वाचं म्हणजे मृतक आणि आरोपी (Nagpur Crime) हे आधी सोबत दारू प्यायला बसले होते. दरम्यान तिथे त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. कालांतराने हा वाद विकोपाला जाऊन या वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि आरोपीने कार्तिक चौबेवर वार करत त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
किरकोळ वाद विकोपाला
पुढे आलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृतक हे एकमेकांना ओळखणारे होते, सोबत दारू सुद्धा पीत बसले होते. त्यांच्यासोबत आणखी दोन ते तीन जण त्या ठिकाणी होते. दरम्यान त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि नंतर त्याचे रूपांतर हत्येमध्ये झाल्याचे समजतंय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी करून आरोपीला अटक केली आहे. तसेच या प्रकरणात इतरांचा ही यात काही सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहे. मात्र या हत्येच्या घटनेने नागपूर शहर पुन्हा एकदा हादरले आहे.
समृद्धी महामार्गावर पुन्हा एका खाजगी ट्रॅव्हल्सचा अपघात; 24 तासाली दुसरी घटना
समृद्धी महामार्गावर पुन्हा एका खाजगी ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात हा सलग दुसरा मोठा अपघात आहे. समृद्धी महामार्गावर गेल्या 24 तासात दुसरा मोठा खाजगी ट्रॅव्हल बसचा अपघात झाल्याने समृद्धी महामार्ग पुन्हा चर्चेत आला आहे. पुण्यावरून रायपूरला जाणाऱ्या हंस ट्रॅव्हल्सचा कारंजा इन्टरचेंज टोल प्लाझा जवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात काही प्रवाशी जखमी झाले असल्याची माहिती कळते आहे. रस्त्याच्यामध्यभागी असलेल्या खड्य्यात बस उतरल्याची माहिती प्राप्त होतेय. मात्र अपघाताच कारण नेमकं काय हे अद्याप कळू शकलेलं नाही. दुसरीकडे या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
