एक्स्प्लोर

मित्रांसोबत खेळताना मांजर चावली, काही वेळातच तब्येत बिघडली; 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत

Nagpur News: डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं. मांजर चावल्यानंच श्रेयान्शुचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मुलाच्या मृत्यूचं खरं कारण समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

Nagpur Crime News: नागपूर : नागपूर जिल्ह्यातील (Nagpur News) हिंगणा तालुक्यात (Hingna Taluka) एका 11 वर्षांच्या मुलाला मांजर चावल्यानं त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मांजरीने चावा घेतल्यानंतर काही तासांत त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. श्रेयान्शु क्रिष्णा पेंदाम, असं या मुलाचं नाव आहे. संध्याकाळी मित्रांसोबत खेळताना मांजरीनं त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या पायाचा चावा घेतला, असं त्यानं आईला सांगितलं. त्यानंतर काही वेळातच मुलाची तब्येत बिघडली. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मांजर चावल्यानंच श्रेयान्शुचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. 

संपूर्ण हिंगणा तालुक्यात श्रेयान्शुच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलाचा मृतदेह पोस्टमार्टसाठी एम्स रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणासंदर्भात हिंगणा पोलिसांनाही माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तसेच, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मुलाच्या मृत्यूचं खरं कारण समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

नेमकं काय घडलं? 

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील उखळी गावात एका 11 वर्षीय बालकाला माजरीने चावा घेतल्यानंतर काही तासात त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.  श्रेयान्शु क्रिष्णा पेंदाम (वय 11) असं मुलाचं नाव आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील उखळी येथे शनिवारी संध्याकाळी 6 वाजता मुलगा आपल्या काही मित्रांसोबत खेळत होता. सायंकाळी 6 वाजता तो घरात आला. खेळत असताना  मांजरानं त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या पायाचा चावा घेतला, असं आईला सांगितलं. त्यानंतर काही वेळानं त्याला मळमळ आणि उलट्या सुरू झाल्या. त्याचे आईवडील त्याला घेऊन डिंगडोह परिसरातील लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी पोहोचले, तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.                        

दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी एम्स रुग्णालयात हलविण्यात आला. हिंगणा पोलिसांना माहिती देण्यात आली त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून उत्तरीय तपासणी अहवाल आल्यावर मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल.                 

महत्त्वाच्या इतर बातम्या :            

Cyber Crime : शेअर बाजारात गुंतवणूक, श्रीमंत बनण्याची लालसा; एका फटक्यात वृद्धानं गमावले 1.12 कोटी

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget