Gadchiroli: अल्पवयीन मुलीची हत्या करुन मृतदेह जमिनीत पुरला, गडचिरोलीत धक्कादायक घटना
Crime: गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील (Bhamaragad Taluka) मन्नेराजाराम (Mannerajaram) परिसरातील गेराटोला (Geratola) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.
![Gadchiroli: अल्पवयीन मुलीची हत्या करुन मृतदेह जमिनीत पुरला, गडचिरोलीत धक्कादायक घटना Murder Of Minor girl, shocking incident in Gadchiroli's Bhamaragad Taluka Gadchiroli: अल्पवयीन मुलीची हत्या करुन मृतदेह जमिनीत पुरला, गडचिरोलीत धक्कादायक घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/29/6f67d581cd137388c55e6584b2ffdfba_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Crime: गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील (Bhamaragad Taluka) मन्नेराजाराम (Mannerajaram) परिसरातील गेराटोला (Geratola) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीची हत्या करुन मृतदेह जमिनीत पुरल्याची माहिती समोर आली आहे. मृत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदवली होती. परंतु, गावाजवळील शेतात तिची चप्पल सापडल्यानंतर त्यांना वेगळाच संशय आला. त्याच ठिकाणी उकरलेली माती आडळल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
एका अल्पवयीन मुलीची हत्या करुन मृतदेह जमिनीत पुरला गेलाय. दरम्यान, मृत मुलीच्या पालकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. चार दिवसानंतर गावाजवळील शेतात तिची चप्पल सापडल्यावर घटनेतील संशय बळावला. शेजारीच माती उकरलेली आढळल्यावर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत तिचं मृतदेह बाहेर काढले. गावातल्या एका तरुणाशी असलेल्या प्रेमसंबधातून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह जमीनीत पुरण्यात आल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पोलिसांनी संशयित मुलाच्या अटकेसाठी कारवाई सुरू केली आहे.
सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या
महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटना बीडच्या पालवन चौक परिसरात घडली आहे. राहुल ईश्वर वाघमारे असं मयत शिक्षकाचं नाव असून ते शहरातील प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते. आत्महत्या करण्यापूर्वी ईश्वर वाघमारे यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)