एक्स्प्लोर

Navi Mumbai Crime : कौटुंबिक वादातून बापानं मुलीची डोकं आपटून केली हत्या, नवी मुंबईत खळबळ

Navi Mumbai Taloja Crime : तळोजा येथील रॅपिड अॅक्शन फोर्समधील एका जवानाने कौटुंबिक वादातून पत्नीसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून आपल्या 3 वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Navi Mumbai Taloja Crime : नवी मुंबईतील तळोजामध्ये एक धक्कादायक घटना उघड झाली आहे.  तळोजा येथील रॅपिड अॅक्शन फोर्समधील एका जवानाने कौटुंबिक वादातून पत्नीसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून आपल्या 3 वर्षीय मुलीला डोक्यावर आपटून, तिच्या पोटामध्ये ठोसे मारुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. 

या नराधम पिता इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने आपल्या मुलीचा मृतदेह लुंगीत गुंडाळून डेब्रीजमध्ये टाकून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा देखील प्रयत्न केला. परशुराम तिपन्ना  असे या आरएएफ जवानाचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्या व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. 

या घटनेतील अटक आरोपी परशुराम तिपन्ना हा मूळचा कर्नाटक राज्यातील असून तो तळोजा येथील रॅपीड अॅक्शन फोर्समध्ये कार्यरत आहे. तसेच तो खारघर मधील पापडीचा पाडा गाव येथील चैतन्य सोसायटीत राहतो.  तो पत्नी भाग्यश्री व 3 वर्षीय मुलगी मिनाक्षी यांच्यासोबत राहण्यास होता. परशुराम याची पहिली पत्नी गावी असल्याने त्याचे दुसरी पत्नी भाग्यश्री हिच्यासोबत नेहमी कौटुंबिक वादातून भांडण होत होते. या वादाचा राग बापाने मुलीवर काढून तिची हत्या केली.  सोमवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास परशुरामचे पत्नी भाग्यश्री सोबत कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाच्या रागात आरोपी परशुराम याने पत्नी भाग्यश्री हिला बेदम मारहाण केली. तसेच त्याने रागाच्या भरात आपली 3 वर्षीय मुलगी मिनाक्षी हिला डोक्यावर आपटून तिच्या पोटात ठोशा बुक्क्याने मारले.

त्यामुळे मुलगी मिनाक्षी मृत झाल्यानंतर हत्येचा हा प्रकार उघडकीस येऊ नये यासाठी आरोपी परशुराम याने आपल्या मुलीचा मृतदेह एका लुंगीत गुंडाळून तळोजा गावाजवळच्या मोकळ्या मैदानात डेब्रिजमध्ये टाकून त्यावर माती टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी काही नागरिकांना लहान मुलीचा मृतदेह निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती खारघर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. तसेच सदरचा मृतदेह पनवेल येथील उप जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

त्यानंतर पोलिसांनी हत्या करण्यात आलेल्या मुलीची ओळख पटविण्यासाठी पापडीचा पाडा गावात शोधमोहिम घेतली. मृत मुलगी ही चैतन्य सोसायटीतील रॅपीड ऍक्शन फोर्समधील जवानाची मुलगी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक सदर इमारतीजवळ गेले असताना आरोपी परशुराम तिपन्ना हा रॅपिड ऍक्शन फोर्सच्या गणवेशात पळून जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडून त्याच्याकडे चौकशी केली. त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता पत्नीसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून त्याने मुलीची डोके आपटीन तिची हत्या केल्याचे तसेच तिच्या मृतदहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिचा मृतदेह लुंगीत गुंडाळून तो डेब्रिजमध्ये टाकून दिल्याची कबुली दिली. 

कौटुंबिक वाद कुठल्या स्तराला जातील याचा नेम नाही. नवी मुंबईतील या घटनेनं हेच अधोरेखित होत आहे. मात्र अशा वादातून निरागस चिमुरडीचा मात्र नाहक बळी गेल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

इतर महत्वाच्या बातम्या

धक्कादायक! चहामध्ये फिनेल, गुलाबजाममध्ये उंदीर मारण्याचं औषध; पत्नीकडून पतीवर विषप्रयोग, पतीच्या खुनाच्या प्रयत्नात महिलेला अटक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघीडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघीडीच्या नेत्यांचे फोन
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Jitendra Awhad Full PC : प्रतिभा पवारांची गेटवर अडवणूक प्रकरण, जितेंद्र आव्हाड अजितदादांवर कडाडलेSantosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांतRajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्या गुंडानी मतदानाच्या मशीन फोडल्य,देशमुखांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघीडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघीडीच्या नेत्यांचे फोन
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
Embed widget