एक्स्प्लोर

महिला पोलीस कॉन्स्टेबलकडून पोलीस शिपायाची सुपारी देऊन हत्या, जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी उचललं टोकाचं पाऊल

मुंबई पोलीसात कॉन्स्टेबल असलेल्या शिवाजी सानप यांचा 15 ॲागस्ट रोजी अपघातात मृत्यू झाला होता. मात्र हा अपघाती मृत्यू संशयास्पद वाटल्याने पनवेल शहर पोलिसांनी तपास सुरूच ठेवला.

नवी मुंबई : मुंबई पोलीस दलात काम करणाऱ्या महिला पोलीस कान्स्टेबलने सुपारी देऊन सहकारी पोलीस शिपायाची हत्या केल्याने मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. अंगावर नॅनो गाडी घालून हत्या करत तो अपघात असल्याचे आरोपींनी फासवले होते. मात्र पनवेल शहर पोलिसांनी तांत्रिक बाबींचा तपास करून तीन आरोपींना अटक केली आहे. 

मुंबई पोलीसात कॉन्स्टेबल असलेल्या शिवाजी सानप यांचा 15 ॲागस्ट रोजी अपघातात मृत्यू झाला होता. मात्र हा अपघाती मृत्यू संशयास्पद वाटल्याने पनवेल शहर पोलिसांनी तपास सुरूच ठेवला. पनवेल रेल्वे स्थानकात उतरून पनवेल बस डेपोकडे जाताना संध्याकाळी अंधाराचा फायदा घेत दोन आरोपींनी सानप यांना मागून धडक देत गंभीर जखमी केले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एका नॅनो गाडीने मागून येऊन शिवाजी सानप यांना उडवले. 

त्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तीन दिवसानंतर शिवाजी सानप यांचा मृत्यू झाला. वापरलेल्या नॅनो गाडीला नंबर प्लेट नव्हती. तसेच घटनेनंतर आरोपींनी तरघर येथील निर्जनस्थळी पुरावा नष्ट करण्यासाठी नॅनो जाळली होती. यामुळे नवी मुंबई, पनवेलमधील सीसीटीव्ही शोधून सर्व गल्ली बोळ शोधूनही पिवळ्या रंगाची नॅनो सापडली नव्हती. तपासात अनेक नॅनो गाड्यांच्या मालकांची चौकशी करण्यात आली, मात्र ठोस काही हाती लागत नव्हते. 

पनवेल शहर पोलिसांनी तपासाची चक्रे मुंबईतून फिरवली. शिवाजी सानप यांनी प्रवास केलेल्या कुर्ला ते पनवेल रेल्वे स्थानकातील सर्व सीसीटीव्ही तपासले. यामध्ये  दोन संशयित इसम शिवाजी सानप यांचा पाठलाग करत असल्याचे समोर आले. सीसीटीव्हीवरून दोन आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले गेले असता  खरी हकीकत समोर आली. या हत्येमागे मुंबई पोलीसात काम करणाऱ्या शिपाई शितल पानसरे यांचा हात असल्याचे समोर आले. या हत्येची सुपारी दिल्याचे त्यांनी कबूल केले. 

मयत शिवाजी सानप व शितल पानसरे हे मुंबईतील नेहरू नगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना दोघांमध्ये वादावादी झाली होती. यानंतर 2019 रोजी सीबीडी आणि कल्याण पोलीस ठाण्यात शितल पानसरेने शिवाजी सानप यांच्यावर विनयंभग, बलात्कार, मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल केले होते. मात्र यानंतरही कायमचा बदला घेण्यासाठी शितल पानसरेने या हत्येचा कट रचला. उलवे येथे राहणाऱ्या सोसायटी मधील वॉचमन विशाल जाधव आणि गणेश चव्हाण यांना हत्येची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी आरोपी शितल पानसरे, विशाल जाधव व गणेश चव्हाण या तीनही आरोपींना अटक केलीय.

शितल पानसरेने हत्येचा कट तीन वर्षांपूर्वीच रचला  

आरोपी पोलीस कॉन्स्टेबल शितल पानसरेने तीन वर्षापूर्वीच शिवाजी सानप यांच्या हत्येचा कट रचला होता. पहिले लग्न होऊनही तीने परत एकदा सोशल मीडियाचा वापर करून धनराज जाधव यांच्याशी दुसरे लग्न केले. अपघात करून हत्या केल्यास संशय येणार नाही, असा विचार शितलने करून ठेवला होता. यासाठी बस ड्रायव्हरच्या शोधात शीतल होती. यासाठी तिने एसटी महामंडळात काम करणाऱ्या धनराज जाधव याला इन्स्टाग्रामवरून ओळख वाढवत गळाला लावला. अवघ्या पाच दिवसाच्या इंन्स्टाग्राम ओळखीचे रूपांतर प्रेमात करून पाचव्या दिवशी शितल पानसरेने धनराज जाधव यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर शिवाजी सानप या पोलिसाची हत्या करण्यासाठी शितलने धनराज जाधव यांच्याकडे तगादा लावला. याकडे दुर्लक्ष करत आपण हे काम करणार नाही, असे सांगितल्या नंतर शितल पानसरे हीने धनराज जाधव यांच्या विरोधात विविध कलमांखाली पोलीस तक्रार केली. याला घाबरून धनराज जाधव यांनी एसटी महामंडळाची नोकरी सोडून चेन्नई येथे पळ काढला होता. या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी धनराज जाधव यांना महाराष्ट्रात बोलवून त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी शितल पानसरेबाबत सर्व जवाब पनवेल शहर पोलिसांना दिला. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Embed widget