एक्स्प्लोर

दाऊद इब्राहिमचा साथीदार डोला सलीम विरोधात कारवाई, मुंबई पोलीस जारी करणार रेड कॉर्नर नोटीस

दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) जवळचा साथीदार डोला सलीम (Dola Salim) आणि त्याच्या मुलाविरोधात मुंबई पोलीस (Mumbai Police) लवकरच रेड कॉर्नर नोटीस (Red Corner Notice) जारी करणार आहे.

Mumbai Police will action against Salim Dola : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) जवळचा साथीदार डोला सलीम (Dola Salim) आणि त्याच्या मुलाविरोधात मुंबई पोलीस (Mumbai Police) लवकरच रेड कॉर्नर नोटीस (Red Corner Notice) जारी करणार आहेत. कारण हे दोघेही एका वर्षात 1000 कोटी रुपयांच्या ड्रग्जचा व्यापार करतात. मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या अनेक जवळच्या साथीदारांवर कारवाई केली आहे. आता डोला सलीम आणि त्याच्या मुलावरही कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 

 डोला सलीम कधी दुबईत तर कधी तुर्कीमध्ये 

दाऊदचा जवळचा सहकारी डोला सलीम आणि त्याचा मुलगा ताहिर डोला यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिसांनी या दोघांविरुद्ध लुक आऊट सर्कुलर (LOC) जारी केले आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात जप्त केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा एक महत्त्वाचा व्यक्ती या ड्रग्ज सिंडिकेटशी संबंधित असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली आहे. दाऊद इब्राहिमचा खास गुंड सलीम सध्या दुबईत बसून दाऊदचा ड्रग्ज व्यवहार पाहत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.  तो कधी दुबईत तर कधी तुर्कीमध्ये फिरत असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. डोला सलीम लोकांना दाखवण्यासाठी रिअल इस्टेटचे काम करतो पण त्याचा खरा व्यवसाय ड्रग्जचा आहे.

पोलीस लवकरच करणार पिता-पुत्राच्या विरोधात रेड कॉर्नर दाखल करणार 

ड्रग्जच्या व्यवसायात डोला सलीमचा मुलगा ताहीर डोलाही त्याला मदत करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळेच गुन्हे शाखेने त्यालाही या प्रकरणात आरोपी केले आहे. आता पोलीस लवकरच या कामात असलेल्या पिता-पुत्राच्या विरोधात रेड कॉर्नर दाखल करणार आहेत. अंडरवर्ल्डच्या इशाऱ्यावर नोटीस जारी केली जाणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, डोला सलीम हा दाऊदच्या निकटवर्तीयांपैकी एक आहे. तो त्याच्यासाठी भारतात ड्रग्जचा व्यापार पाहतो.

सांगली जिल्ह्यातील एका ड्रग्ज निर्मिती कारखान्यावर छापा, 245 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

महिला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका ड्रग्ज निर्मिती कारखान्यावर छापा टाकला होता. तिथून पोलिसांनी 122.5 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले होते. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 245 कोटी रुपये आहे. या कारखान्यात पोहोचण्यापूर्वी मुंबई गुन्हे शाखा सहा महिन्यांपासून एकामागून एक लिंक जोडत होती. 6 महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांना सांगलीच्या कारखान्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर तेथील पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे.

एका प्रकरणात डोला सलीमला झाली होती अटक

या प्रकरणापूर्वी डोला सलीमला मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने तत्कालीन आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सांताक्रूझ परिसरात टाकलेल्या छाप्यात अटक केली होती. 100 किलो फेंटॅनाइल ड्रग्ज जप्त केले होते. 1000 कोटी जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी डोला सलीमला रंगेहात अटक केली होती. त्यात डोलाला जामीन मिळाला आणि जामीन मिळताच तो नेपाळमार्गे पळून जाऊन लपण्यासाठी दुबईला गेला होता. आता त्याने तिथून दाऊदसाठी ड्रग्जचा धंदा सुरू केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Ajay Shrivastav : दाऊदच्या मालमत्तेवर कोट्यावधींची बोली लावणारे अजय श्रीवास्तव आहेत तरी कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रमDhananjay Deshmukh : धनंजय देशमुख अंतरवाली सराटीत, मनोज जरांगेंच्या भेटीचं कारण काय?Top 70 at 07 AM Superfast 7AM 16 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
Saif Ali Khan Attacked in Mumbai: सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
PM Kisan : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 कधी येणार?शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2 हजार कधी येणार,शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
Nagpur News : महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र देण्यास विलंब! पारधी समाजावर मुलींचे लग्न बालवयात लावण्याची दुर्दैवी वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक प्रकार
महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र देण्यास विलंब! पारधी समाजावर मुलींचे लग्न बालवयात लावण्याची दुर्दैवी वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक प्रकार
Embed widget