एक्स्प्लोर

गोळीबारानं कुर्ला पुन्हा हादरलं; बीएमसी कंत्राटदारावर अज्ञातांकडून गोळीबार 

Firing in Kurla Mumbai : मुंबईतील कुर्ला परिसरात घडलेल्या घटनेनं खळबळ माजली आहे. गोळीबारानं कुर्ला पुन्हा हादरलं असून बीएमसी कंत्राटदारावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आहे.

Mumbai Kurla Firing News : मुंबईतील (Mumbai News) कुर्ला (Kurla) पश्चिममध्ये काल (सोमवारी) गोळीबाराची (Firing in Kurla) घटना घडली आहे. मुंबई पालिका (Mumbai Municipal Corporation) कंत्राटदारावर दोन अज्ञातांकडून गोळीबार (Firing by Unknowns) करण्यात आला. कामावरुन घरी परतत असताना अचानक दोन अज्ञातांनी गाडीवर गोळीबार केला. या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे. 

कुर्ला पश्चिममध्ये (Kurla West) अज्ञात हल्लेखोरांकडून बीएमसी कंत्राटदाराच्या (BMC Contractor) गाडीवर गोळीबार करण्यात आला आहे. सूरज प्रतापसिंह असं कंत्राटदाराचं नाव असून सुदैवानं ते सुखरुप आहेत. गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. 

काय घडलं? 

मुंबईतील कुर्ल्यात सोमवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. कुर्ल्यातील कपाडीया नगर येथे महानगरपालिकेचे कंत्राटदार म्हणून काम करणारे सूरजप्रताप सिंह कामावरुन घरी परतत होते. काम आटपून कुर्ल्याहून ते बोरीवलीला असलेल्या आपल्या राहत्या घराच्या दिशेनं निघाले. आपल्या इनोव्हा क्रिस्टा गाडीनं त्यांनी प्रवास सुरू केला. एवढ्यातच कपाडीया जंक्शनजवल त्यांची गाडी पोहोचताच दोन अज्ञात इसम त्याठिकाणी आले आणि त्यांनी सूरज प्रतापसिंह यांच्या गाडीवर गोळीबार केला. काही राऊंड फायरिंग केल्यावर दोन्ही अज्ञात इसमांनी तिथून पोबारा केला. सुदैवानं या घटनेत कोणालाही इजा झालेली नाही. सूरज प्रतापसिंह आणि त्यांचा ड्रायव्हर दोघेही सुखरुप आहेत. घटनेनंतर सूरज प्रतापसिंह यांनी पोलीस स्थानक गाठून घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सदर प्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली आहे. 

पोलिसांनी माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि तपास सुरू केला. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळवलं आणि आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलिसांकडून लवकरात लवकर अज्ञात गोळीबार करणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

गोवा गुटखाचे मालक जे एम जोशी यांना 10 वर्षांची शिक्षा; दाऊदला पाकिस्तानात  व्यवसाय सुरू करण्यात मदत केल्याचा आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
विधानसभेत लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही; विधिमंडळात पडसाद, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही; विधिमंडळात पडसाद, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
Chhagan Bhujbal : होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange on Bhujbal : मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचं मला देणं घेणं नाही, भुजबळांवर भाष्य टाळलंPrakash Ambedkar Full PC : सोमनाथ सूर्यवंशींच्या अंत्यसंस्काराला मी थांबणार : प्रकाश आंबेडकरAshok Chavan :मी मुख्यमंत्री असतो, तर नांदेडला मंत्रिपद देण्याचा विचार केला असताRajendra Gavit on Cabinet|महायुतीच्या मंत्रिमंडळात आदिवासी आमदारांना स्थान नाही,राजेंद्र गावित नाराज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
विधानसभेत लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही; विधिमंडळात पडसाद, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही; विधिमंडळात पडसाद, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
Chhagan Bhujbal : होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
होय, मी नाराज... छगन भुजबळ तडकाफडकी नाशिकला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणार की वेगळा निर्णय घेणार?
IND vs AUS : ऑस्ट्रेलियात टीम इंडिया संकटात, रोहित शर्मा अन् गौतम गंभीरमधील समन्वयावर सवाल,  दोन मालिकेतील पराभवाचा दाखला 
रोहित अन् गंभीरमधील केमिस्ट्रीवर प्रश्नचिन्ह, टीम इंडिया ऑस्ट्रेलियात संकटात,नेमकं काय घडतंय?
Chhagan Bhujbal : भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...
भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...
Nagpur News : महायुतीच्या सर्व आमदारांना संघ कार्यालयातून निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात महायुतीच्या सर्व आमदारांना निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
Embed widget