Mumbai Hit And Run : मुंबईत पुन्हा 'हिट अँड रन'चा थरार; 25 वर्षीय निष्पाप मॉडेलनं गमावला जीव, एक जण गंभीर जखमी
Mumbai Hit And Run Accident in Bandra : 'हिट अँड रन'ने 25 वर्षीय मॉडेलचा जीव घेतला आहे. मुंबईत घडलेल्या भीषण अपघातात मॉडेल शिवानी सिंगचा मृत्यू झाला आहे.
Model Accident Case in Mumbai : मुंबईत 'हिट अँड रन'चं सक्ष सुरुच असल्याचं दिसत आहे. पुन्हा एकदा हिट अँड रनच्या दुर्घटनेत निष्पाप तरुणीला जीव गमवावा लागला आहे. वांद्रे येथे झालेल्या 'हिट अँड रन' अपघातात 25 वर्षीय मॉडेलचा दुर्दैवी अंत झाला आहे. वांद्रे पश्चिम येथे गुरुवारी भीषण अपघात झाला, यामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. वांद्रे पश्चिम येथे झालेल्या 'हिट अँड रन' अपघातात शिवानी सिंह या 25 वर्षीय मॉडेलला आपला गमावावा लागल्याची घटना घडली आहे. शिवानी मित्रासोबत बाईकने प्रवास करत असताना हा भीषण अपघात झाला. डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अपघात घडला.
मुंबईत पुन्हा 'हिट अँड रन'चा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, मयत शिवानी सिंह तिच्या मित्राच्या दुचाकीवर मागे बसून प्रवास करत होती. रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी वांद्रे पश्चिम येथील कलंत्री चौकात आली. यावेळी एका असता एका डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. डंपरने दिलेल्या भीषण धडकेत शिवानीला तोल गेला. या अपघातात शिवानी डंपरच्या चाकाच्या खाली आल्याने गंभीररीत्या जखमी झाली होती. यानंतर जखमी अवस्थेत स्थानिकांनी शिवानी आणि तिचा मित्र दोघांना भाभा रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथे डॉक्टरांनी शिवानी सिंहला तपासून मृत घोषित केलं. अपघातात शिवानीच्या मित्राचा पाय फॅक्चर झाला आहे. दरम्यान, डंपरचालक डंपर सोडून घटनास्थळावरून फरार झाला.
25 वर्षीय निष्पाप मॉडेल तरुणीचा बळी
मृत शिवानी सिंह ही 25 वर्षीय तरुणी मॉडेल असून ती मालाड पश्चिम येथे वास्तव्यास आहे, ती चित्रपटसृष्टीत काम करते. शिवानी सिंहला नुकतंच इंडस्ट्रीमध्ये काम मिळण्यास सुरुवात झाली होती. नुकत्याच झालेल्या एका मोठ्या फॅशन विकमध्ये तिने सहभाग घेतला होता. तिचे करिअर कुठे सुरु झालं होतं आणि तिच्यावर काळाने घाला घातला. शिवानीच्या अपघाती मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबियांना आणि मित्रमंडळींना मोठा धक्का बसला आहे.
टँकर जप्त, आरोपी टँकरचालक फरार
पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेसंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, शिवानी सिंह तिच्या मित्रासह बाईकने प्रवास करत होती. शिवानीच्या मित्राने हेल्मेट घातलं होतं. शिवानीचा मित्र बाईक चालवत होता, त्याने मद्यप्राशन केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आलेलं नाही. अपघातानंतर टँकरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. टँकर जप्त करण्यात आला आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, लवकरच आरोपी टँकरचालकाला अटक केले जाईल. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :