एक्स्प्लोर

Mumbai News : कर्जाला कंटाळून संपवलं आयुष्य, पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून शोधकार्य सुरु

Mumbai News : कर्जबाजारी झाल्याने मुंबईतील व्यक्तीने मानसिक तणावाखाली येऊन आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान यामुळे परिसरात एकच खळबळ माजली.

मुंबई : कर्जबाजारीपणाला कंटाळून मुंबईतील (Mumbai) अंधेरी (Andheri) परिसरातील वर्सोवा पुलावरुन एका इसमाने उडी मारुन त्याचं आयुष्य संपवलं. दरम्यान सध्या पोलीस (Police) आणि अग्निशमन विभागाकडून शोधकार्य सुरु करण्यात आलंय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं. कर्जाला कंटाळून या इसमाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सध्या पोलिसांकडून देण्यात येतेय. 

मुंबईतील भाईंदर परिसरात राहणाऱ्या अतुल धांडिया वय 52 वर्ष हे रविवारपासून घरी आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार भाईंदर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ शोधण्यास सुरुवात केली. त्याच वेळी म्हणजेच बुधवार 27 डिसेंबर रोजी धांडिया यांच्या भावाने ते वर्सोवा पुलावर दुचाकी जवळ उभे असल्याचं पाहिलं. पण भावाला समोर पाहताच त्यांनी त्याच पुलावरुन खाली उडी मारली. 

अतुल यांनी ज्यावेळी पाण्यात उडी मारली त्यावेळी ओहोटीची वेळ होती. त्यामुळे पाण्यातून वाहत जात असल्याचं अतुल यांच्या भावानं पाहिलं. त्यांच्या भावाने तातडीने पोलीस स्थानकात धाव घेतली. त्यानंतर काशिमीरा पोलीस आणि अग्निशमन विभागाने त्यांचा शोध सुरु केला. पण 24 तास उलटले तरीही त्यांचा शोध लागलेला नाही. अतुल धांडिया बोरीवलीतील खासगी कंपनीत कामाला होते. मात्र कर्ज असल्यामुळे ते मानसिक तणावाखाली होते. याच तणावामुळे त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचलले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

यवतमाळ MBBS विद्यार्थीनीची आत्महत्या

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (Shri Vasantrao Naik Government Medical College Yavatmal) येथील एका एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सुहानी ढोले अस मृत विद्यार्थिनीचे नाव असून या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना काल, 28 डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  मृत विद्यार्थिनी यवतमाळच्या वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून आत्महत्यांचे कारण अद्याप कळू शकले नाही.  या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा : 

Nagpur Crime News : भाजप नेत्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला प्रकरणाचा CCTV व्हिडीओ आला समोर: अल्पवयीनसह सहा आरोपींना अटक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Embed widget