एक्स्प्लोर

Mumbai Crime : वीज बिल भरण्याच्या नावाखाली फसवणूक, दोघांना झारखंडमधून अटक, बीकेसी सायबर पोलिसांची कारवाई

Mumbai Crime : वीज बिल भरण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईच्या वांद्रे बीकेसी सायबर पोलिसांनी या दोघांना झारखंड इथून अटक केली.

Mumbai Crime : तुम्ही भरलेलं वीज बिल (Electricity Bill) सिस्टमध्ये अपडेट झालेलं नाही, त्यामुळे तुमचं वीज कनेक्शन बंद करण्यात येईल, असा मेसेज जर तुम्हाला आला तर वेळीच सावध व्हा. कारण अशा मेसेजच्या माध्यमातून तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. वीज बिल भरण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. तुम्ही मागील महिन्यात वीज बिल भरलं आहे. परंतु ते सिस्टमला अपडेट झालं नसल्याने तुमची लाईट कट करण्यात येईल, असं सांगून या दोघांनी अनेकांची फसवणूक केली होती. मुंबईच्या (Mumbai) वांद्रे बीकेसी सायबर पोलिसांनी या दोघांना झारखंड (Jharkhand) इथून अटक केली. सचिनकुमार भरत मंडल (वय 24 वर्षे) आणि संजितकुमार सिताराम मंडल (वय 25 वर्षे) अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत.

तक्रारदाराच्या खात्यातून 55 हजार रुपये लंपास
सुधीर भानुदास माने असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीकेसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे सुधीर भानुदार माने यांच्या मोबाईल क्रमांकावर वीज बिलासंदर्भात मेसेज आला. तुमचं वीज बिल अपडेट नसल्यामुळे वीज कट करण्यात येईल, असा मेसेज सुधीर माने यांना 17 नोव्हेंबर रोजी आला होता.  सोबतच यात मोबाईल क्रमांकही दिला होता. घाबरलेल्या माने यांनी तात्काळ मेसेजमधील मोबाईल क्रमांकावर कॉल केला. त्यावेळी समोरच्या व्यक्तीने तुमचं बिल ऑनलाईन अपडेट करत असल्याचं सांगून त्यांना दहा रुपयांची पेमेंट लिंक पाठवून त्यावर पेमेंट करण्यास सांगितलं. सुधीर माने यांनी पेमेंट करताचा आरोपींनी त्यांचे बँक डिटेल्स मिळवले आणि खात्यातून 55 हजार रुपये काढले. बँकेतून तब्बल 55 हजार रुपये डेबिट झाल्याचं कळताच माने यांनी त्या व्यक्तीला फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर सुधीर माने यांनी तातडीने वांद्रेमधील बीकेसी पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवली

आरोपींकडून WHATSPROMO या अॅपचा वापर
सुधीर माने यांनी दिलेल्या तक्रारीवरुन बिकेसी पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 419,  420, 34 सह कलम 66(क), 66 (ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तांत्रिक कौशल्याचे आधारे गुन्ह्याचा तपास करुन दोन्ही आरोपींना 20 नोव्हेंबर रोजी झारखंड या ठिकाणाहून अटक करण्यात आली. तसंच बीकेसी सायबर पोलिसांनी आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेले एकूण सहा मोबाईल फोन आणि विविध कंपन्यांचे दहा सिमकार्ड जप्त केले आहेत. गुन्हा करण्यासाठी आरोपींनी WHATSPROMO या अॅपचा वापर करुन बल्क मेसेज पाठवून भारतातील विविध भागातील नागरीकांना फसवल्याचे प्रथमदर्शनी दिसून आलं आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास सुरु आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
Embed widget