एक्स्प्लोर

Mumbai Crime News: दोघांच्या भांडणाचा तिसऱ्या प्रवाशाला फटका, एकाने रेल्वेच्या दिशेने दगड भिरकावला अन् अकाऊंटंटचा डोळा गेला; मुंबईतील धक्कादायक प्रकार

Mumbai Crime News: काही दिवसापूर्वी मालाड रेल्वे स्थानकात किरकोळ वादातून प्रवाशाने एका प्रोफेसरची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक गंभीर प्रकार उघडकीस आलाय.

Mumbai Crime News: लोकल ट्रेनमध्ये (Local Train) झालेल्या किरकोळ वादाचा फटका थेट एका निरपराध प्रवाशाला बसल्याची धक्कादायक घटना वांद्रे रेल्वे स्थानकात (Bandra railway station) घडली आहे. दोन प्रवाशांमधील भांडण इतके टोकाला गेले की, त्यातील एकाने रेल्वे ट्रॅकवर उतरून धावत्या ट्रेनच्या दिशेने दगड भिरकावला. मात्र हा दगड भांडणात नसलेल्या तिसऱ्याच प्रवाशाच्या डोळ्याला लागल्याने त्याला गंभीर इजा झाली आहे.

या घटनेत अकाउंटंट असलेल्या निशांत खत्री यांना डोळ्याला जबर दुखापत झाली असून, डॉक्टरांनी संबंधित डोळा यापुढे काम करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. एका क्षणाच्या रागातून झालेल्या या कृतीमुळे एका निष्पाप व्यक्तीचे आयुष्य कायमचे बदलले आहे. ही घटना वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात घडली असून, घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Mumbai Crime News: महिन्याभरातील दुसरी धक्कादायक घटना

विशेष म्हणजे, मालाड रेल्वे स्थानकात काही दिवसांपूर्वीच किरकोळ वादातून एका प्रवाशाने एका प्रोफेसरची निर्घृण हत्या केल्याची घटना ताजी असतानाच, आता वांद्रे स्थानकात हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना, क्षुल्लक कारणांवरून होणारे वाद आणि त्यातून घडणाऱ्या हिंसक घटना अत्यंत गंभीर ठरत आहेत. क्षणिक रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा अधोरेखित होत असून, अवघ्या महिन्याभरातील ही दुसरी धक्कादायक घटना असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली जाण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pune Crime News: मित्रामुळेच आपला ब्रेकअप झाल्याचा संशय; भेटल्यानंतर तिला फोन लावण्यावरून दोघांचा टोकाचा वाद; कोयत्याने सपासप वार अन्..., पुण्यातील हादरवणारा व्हिडीओ

Court on Online Fraud Case: ऑनलाईन फसवणूक प्रकरणी ग्राहकाने स्वतः ओटीपी दिल्यास बँक निर्दोष; ग्राहक न्यायालयाचा निर्वाळा

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
Pune Crime News: दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
Pune Crime News: नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Embed widget