Mumbai Crime News: 35 रुपयांवरुन वाद, पानटपरीवर मित्रांनीच मित्राच्या काकांना जिवंत जाळलं; मुंबईतील घटनेने सर्व हादरले, नेमकं काय घडलं?
Mumbai Crime News: 35 रुपये बाकी असल्याचा राग धरून नागेंद्र यादवने मित्राच्याच काकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचे समोर आले आहे.

Mumbai Crime News मुंबई: मुंबईतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 35 रुपये बाकी असल्याचा राग धरून नागेंद्र यादवने मित्राच्याच काकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचे समोर आले आहे. मुंबईतील जोगेश्वरी भागात सदर घटना घडली. (Mumbai Jogeshwari Crime News)
नेमकं काय घडलं? (Mumbai Crime News)
सिगरेटच्या 35 रुपयांवरून दोन व्यक्तींमध्ये वाद झाला. हाच राग मनात धरून भांडण सोडवायला गेलेल्या मित्राच्या काकाला मित्रांनीच पेट्रोल टाकून जीवन जाळण्याचा प्रयत्न केला. 22 वर्षीय नागेंद्र यादवने आपल्या मित्राचे काका राजेंद्र यादव यांच्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले. संपूर्ण घटना जोगेश्वरी परिसरात एका पानटपरीवर घडली. सिगरेटच्या पैसे घेण्यावरून पानटपरीवर नागेंद्र यादव आणि त्याच्या मित्रामध्ये वाद झाला. यावेळी वाद सोडवायला गेलेल्या राजेंद्र यादव यांच्यावर नाराज मित्रांनी पेट्रोल टाकून आग लावून दिली. पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचं घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सर्व दृश्य कैद झालं आहे. या आगीत राजेंद्र यादव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी नागेंद्र यादवला अटक करून पुढील तपास सुरू केली आहे.























