(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Crime News : 90 दिवसांपासून बेपत्ता मुंबईतील शिक्षिका, मारिया खान गेली कुठे? शोधण्यासाठी भोईवाडा पोलीस सतर्क
Mariya Khan Missing Case : गेल्या 90 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मारिया फातिमा खान या 30 वर्षीय शिक्षिकेचा शोध घेण्यासाठी मुंबईतील भोईवाडा पोलीस सतर्क झालं आहे.
मुंबई : गेल्या 90 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मारिया फातिमा खान (Mariya Khan ) या 30 वर्षीय शिक्षिकेचा शोध घेण्यासाठी मुंबईतील भोईवाडा पोलीस (Bhoiwada Police) सतर्क झालं आहे. पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे. मारिया 18 मे रोजी बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी 21 मे रोजी भोईवाडा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. तिच्यासोबत काही अघटित तर झालं नाही ना, अशी चिंता तिच्या कुटुंबियाना सतावत आहे.
90 दिवसांपासून बेपत्ता मुंबईतील शिक्षिका
भोईवाडा दादर येथून 90 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या 30 वर्षीय शिक्षकाचा भोईवाडा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. मारिया फातिमा खान असे नाव असलेली महिला 18 मे रोजी बेपत्ता झाली होती आणि 21 मे रोजी भोईवाडा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. खानने एका गोवंडीतील सॉफ्टवेअर अभियंत्याशी लग्न केले आहे आणि पतीसोबत काही वैयक्तिक वाद ज्यानंतर तीने घर सोडल आहे आणि बेपत्ता झाली असा कुटुंबाचा दावा आहे.
मारिया खान गेली कुठे?
मारिया खान एका खाजगी शाळेतील प्राथमिक शिक्षिका आणि एमबीए उत्तीर्ण आहे. चार वर्षांपूर्वी मारियाचं सॉफ्टवेअर इंजिनिअर अक्रम खानशी लग्न झालं. लग्नाआधी ती परळ परिसरात राहायची पण लग्नानंतर गोवंडीला शिफ्ट झाली आणि तिथे ती सासरच्या मंडळींकडे राहायची. एबीपी माझाशी बोलताना तिची आई नजमुनिसा खान यांनी सांगितलं की, 17 मे 2023 रोजी मारियाच्या पतीने त्यांच्यात काही वाद झाल्यानंतर तिला आमच्या घरी सोडलं. तिचा हाथ पकडून तिला घरी खेचत आणल्याचा सीसीटीव्ही फुटेजमध्येही कैद झाला आहे.
शोधण्यासाठी भोईवाडा पोलीस सतर्क
18 मे रोजी मारिया भोईवाडा पोलीस ठाण्यात गेली असता अक्रमलाही बोलावण्यात आलं होतं. 18 मे रोजी झालेल्या बैठकीनंतर ती भोईवाडा पोलीस ठाण्यातून बाहेर आली व निघून गेली आणि घरी परतली नाही. आता नेमकी कुठे आहे, अशी चिंता कुटुंबीयांना सतावत आहे. पोलिसांनी त्यांना हे प्रकरण सोडवण्यासाठी मदत करावी, अशी विनंती कुटुंबीयांनी केली आहे. परदेशात काम करणारा मारियाचा भाऊ अल्तमशही तिचा शोध घेण्यासाठी मुंबईत आला असून आणि त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष घालावं आणि कुटुंबाला महिलेचा शोध घेण्यास मदत करावी अशी विनंती केली आहे. पोलिसांनी आमच्या बहिणीचा शोध घेणं हे पहिलं प्राधान्य आहे, असल्याचं मारियाच्या भावाने सांगितलं आहे. मारिया गायब होण्यामागे च्या पतीचा हात असल्याची शंका मारियाच्या कुटुंबियांना आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :