एक्स्प्लोर

Mumbai : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Mumbai Crime : युक्ता ही मागासवर्गीय असल्यामुळेच तिच्या सासरच्या लोकांनी तिला त्रास दिला आणि तिचा छळ केल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला आहे.

मुंबई: मागासवर्गीय जातीची असल्यामुळे सासरकडच्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून 20 वर्षीय विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना चेंबूर येथे घडली. या प्रकरणी मृत विवाहितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून आरसीएफ पोलिस ठाण्यात मुलीच्या पतीसह सासरा, सासू आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युक्ता (20वर्ष) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. 

सासरच्यांच्या जाचाला कंटाळूनच या विवाहितेने आत्महत्या केली असा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. त्यांनी तशी तक्रार दिल्याने आरसीएफ पोलीस ठाण्यात विवाहितेचा पती हर्षल तसेच सासू, सासरे आणि नणंदेविरोधात भादवि कलम 306, 498-अ, 323, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युक्ता ज्या इमारतीत राहत होती त्याच इमारतीत राहणाऱ्या हर्षल संकपाळ याच्याशी तिचे सुत जुळले. पण दोघांच्या प्रेमसंबंधाला हर्षलच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे हर्षल आणि युक्ता यांनी लपून लग्न केले होते. युक्ता मागासवर्गीय असल्याने हर्षलच्या घरच्यांचा तिला विरोध होता. मात्र तरी हर्षलने तिच्याशी लग्न केले. 

या दोघांनी लग्न केल्याचं त्यांच्या घरच्यांना समजल्यानंतर ते दोघेही चेंबूर कँम्प परिसरात एक रुम भाड्याने घेऊन तेथे ते राहू लागले. 25 जुलै रोजी या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झाले आणि तेव्हा हर्षलने युक्ताला मारहाण देखील केली होती. त्यानंतर 26 तारखेला युक्ता राहत्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत सापडली होती. युक्ता ही मागासवर्गीय असल्यामुळेच तिच्या सासरच्या लोकांनी तिला त्रास दिला आणि तिचा छळ केल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला 
आहे. त्यातूनच तिने आत्महत्या केली असल्याचंही तिच्या घरच्यांचं मत आहे.  

महत्त्वाच्या बातम्या: 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 
डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 
Kalyan Crime : संपत्तीच्या वादातून मित्रानेच काढला शिक्षिकेचा काटा, ATM चा वापर करुन पैसेही काढले, दोन आरोपींना अटक 
Kalyan Crime : संपत्तीच्या वादातून मित्रानेच काढला शिक्षिकेचा काटा, ATM चा वापर करुन पैसेही काढले, दोन आरोपींना अटक 
Ambernath Crime News: मुलामुळे दोघांच्या शारीरिक संबंधांमध्ये अडथळा; आईच्या प्रियकराने वरवंटा मारला, चिमुकल्याने जीव गमावला, अंबरनाथमधील धक्कादायक घटना
मुलामुळे दोघांच्या शारीरिक संबंधांमध्ये अडथळा; आईच्या प्रियकराने वरवंटा मारला, चिमुकल्याने जीव गमावला, अंबरनाथमधील धक्कादायक घटना
Ambernath Crime News: दोघांच्या शरीरसंंबंधात लहान मुलाचा अडसर, अंबरनाथमध्ये आईच्या प्रियकराने चिमुरड्याला निर्दयीपणे संपवलं, अन्...
दोघांच्या शरीरसंंबंधात लहान मुलाचा अडसर, अंबरनाथमध्ये आईच्या प्रियकराने चिमुरड्याला निर्दयीपणे संपवलं, अन्...

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget