एक्स्प्लोर

Mumbai Crime : बाप-मुलीच्या नात्याला काळिमा, मुलुंडमध्ये नराधमाचा सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार

या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली आहे. 

मुंबई: बाप-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मुंबईत घडली आहे. मुलुंडमधील एका 50 वर्षीय व्यक्तीला त्याच्याच 15 वर्षाच्या सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने 2020 पासून सातत्याने या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं पोलिस तपासातून समोर आलं आहे. मुलुंड पोलिसांनी या नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. 

पीडितेच्या आईने शुक्रवारी  मुलुंड पोलिसांत गुन्हा नोंदवला. तिला आरोपी त्यांच्या घरात संबंधित मुलीवर लैंगिक अत्याचार करत असताना त्याला आढळले. त्यानंतर तिने पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी सांगितले की, मुलीच्या आईला हे कृत्य यापूर्वीही लक्षात आले होते आणि तिने आरोपीला याबाबत सावध केले होते.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा व्यवसायाने ड्रायव्हर आहे आरोपी त्याची पत्नी (या प्रकरणातील तक्रारदार), तीन सावत्र मुली त्यामध्ये 15 वर्षांची पीडित, 12 वर्षाची आणि 9 वर्षांच्या दोन मुलींसह मुलुंड येथे राहत होता. आरोपी आणि पीडितेची आई या दोघांचे यापूर्वी लग्न झाले होते आणि काही कारणास्तव ते वेगळे झाले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, 2011 मध्ये फिर्यादी तिच्या पहिल्या पतीपासून विभक्त होऊन ठाण्यात राहत होती. पोटापाण्यासाठी ती एका खाजगी कंपनीत काम करू लागली.  2013 मध्ये ती ठाण्यात आरोपीला भेटली आणि ते दोघे चांगले मित्र झाले. आरोपीही विवाहित असून त्याला दोन मुले असून तो पत्नीपासून विभक्त होता. त्यानंतर 2014 मध्ये या जोडप्याचे लग्न झाले आणि फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, लग्नानंतर ती तिच्या तीन मुलींसह तिच्या दुसऱ्या नवऱ्याच्या मुलुंड येथील आरोपीच्या घरी राहायला गेली.

तक्रारदाराने आरोप केला आहे की, 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान ती आणि तिचा दुसरा पती म्हणजे आरोपी आणि मुली खोपोली येथे तिच्या मूळ गावी गेल्या होत्या. जेव्हा तिला पहिल्यांदा लक्षात आले की तिच्या मोठ्या मुलीसोबत तिच्या पतीचे वागणे सामान्य नाही.  तिने त्याला या कृत्यासाठी ताकीद देखील दिली होती असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 

पण गेल्या आठवड्यात पुन्हा तिच्या मुलीसोबत गैरवर्तन झाल्याचे लक्षात आले आणि शुक्रवारी जेव्हा त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, तेव्हा आईने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला असे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, मुलीसह आई मुलुंड पोलिसांकडे आली आणि आईच्या सांगण्यावरून त्यांनी बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.  आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  पुढील तपास सुरू आहे.

 

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

परवाना निलंबित, तरीही बेकरी सुरु, प्रशासनाची लातूर जिल्ह्यातील रेणापूर पोलिसांत गुन्हा दाखल
परवाना निलंबित, तरीही बेकरी सुरु, प्रशासनाची लातूर जिल्ह्यातील रेणापूर पोलिसांत गुन्हा दाखल
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणी केमिस्ट्री प्राध्यापकाचा शोध सुरू, लातूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सीबीआयचा मुक्काम
नीट पेपरफुटी प्रकरणी केमिस्ट्री प्राध्यापकाचा शोध सुरू, लातूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सीबीआयचा मुक्काम
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget