Mumbai Crime : बाप आहे की सैतान... पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत नको ते कृत्य, मुंबईतील धक्कादायक घटना
Mumbai Crime News : पोटच्या अल्पवयीन मुलीशीच वडिलांनीच गैरवर्तन केल्याची घटना वडाळ्यात उघडकीस आली आहे.
Crime News : वडाळ्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पोटच्या अल्पवयीन मुलीशीच वडिलांनी गैरवर्तन केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीनेच वडिलांविरोधात दिलेल्या तक्रारीनंतर वडाळा टीटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वडाळ्यात पोटच्या अल्पवयीन मुलीशीच वडिलांकडून गैरवर्तन केल्याचा जात होते. 16 वर्षीय मुलगी झोपेत असताना वडिलांकडूनच मुलीला चुकीचा स्पर्श केला जात होता. मुलीने याबाबत कोणाला सांगितल्यास तिला नग्न घराबाहेर काढण्याची धमकी आरोपी वडिलांकडून दिली जात होती.
चर्चमध्ये सांगितली आपबिती
या घटनेमुळे मुलगी अनेक दिवसांपासून मानसिक तणावात होती. दरम्यान चर्चमध्ये मुलीने आपबिती सांगितल्यानंतर हा सर्व प्रकार पुढे आला आहे. मुलीने वडिलांविरोधात दिलेल्या तक्रारीनंतर वडाळा टीटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली आहे. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिस अधिक तपास करत आहेत.
नवी मुंबईत आई अन् मुलाचा मृतदेह आढळला
दरम्यान, नवी मुंबईतील (Mumbai) कामोठ्यातील एका इमारतीच्या घरात आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आला होता. घरातील दोन्ही मृतांची हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला होता. मुलाच्या अंगावर मारल्याचे व्रण आहेत. नवी मुंबईतील कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम्ज अपार्टमेन्टमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा घरातील एलपीजी गॅस लिक असल्याचे आढळलून आले होते. दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले होते. ही घटना हत्या की आत्महत्येची आहे, याचा शोध पोलीस घेत होते. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी