एक्स्प्लोर

Dadar Crime News: दादर सुटकेस हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, मूकबधिर कम्युनिटीत अर्शदचं फॅन फॉलोअिंग वाढल्याने परदेशातून सुपारी?

Maharashtra Crime News: दादर रेल्वे स्थानकात एक व्यक्ती तुतारी एक्स्प्रेसमध्ये बॅग चढवत होता. ही बॅग चढवताना या व्यक्तीला घाम फुटला होता. पोलिसांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने बॅग तपासली. त्यामध्ये एक मृतदेह होता.

मुंबई: दादर रेल्वे स्थानकात अलीकडेच एका सुटकेसमध्ये मृतदेह सापडल्याची खळबळजनक घटना घडली होती. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव अर्शद अली सादिक शेख (Arshad Shaikh) असे आहे. अर्शदच्या दोन मित्रांनीच त्याची हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी जय चावडा आणि शिवजित सिंग या दोघांना अटक केली होती. अर्शद, जय आणि शिवजित हे तिघेही मूकबधिर आहेत. जय चावडा आणि शिवजित सिंग यांच्याकडून हत्याप्रकरणाच्या (Dadar Suitcase Murder Case) चौकशीत दररोज नवीन माहिती समोर येताना दिसत आहेत. सुरुवातीला यामध्ये पैशांचा व्यवहार आणि अनैतिक संबंधांचा पैलू समोर आला होता. मात्र, याप्रकरणात सातत्याने परदेशातील एका व्यक्तीचा काहीतरी संबंध असल्याचे अनेक संदर्भ आणि पुरावे समोर येताना दिसत आहेत.

जय चावडा आणि शिवजित सिंग यांनी पायधुनी येथे अर्शदची हत्या केली होती. त्यावेळी शिवजितने अर्शदचे सगळे कपडे उतरवून त्याला मारहाण केली होती. नंतर  डोक्यात हातोडी घालून अर्शदचा शेवट केला होता. यावेळी शिवजित सिंगने एका व्यक्तीला व्हीडिओ कॉल केला होता. या व्यक्तीचे नाव जगपाल सिंग असल्याचे समोर येत आहे. जगपाल सिंग दुबई किंवा बेल्जियममध्ये असल्याचा संशय आहे. शिवजित सिंगने अर्शदला ठार मारताना जगपालला व्हिडिओ कॉल केला तेव्हा त्याने हा व्हीडिओ कॉल आणखी दोन महिलांना दाखवला. त्यामुळे जगपालनेच अर्शद अली सादिक शेखला मारण्यासाठी सुपारी दिली होती का, यादृष्टीने पोलीस आता तपास करत आहेत. 

जगपालने अर्शदची सुपारी का दिली असावी? पोलिसांना नेमका कोणता संशय

जगपाल हा जय चावडा याचा जवळचा मित्र होता. जय चावडा हा सधन कुटुंबातील असून त्याचे नातेवाईकही परदेशात राहतात. मूकबधिरांच्या वर्तुळात जगपाल सिंगला मोठा मान होता. परंतु, अलीकडच्या काळात अर्शद अली सादिक शेख यालाही मूकबधिर समूहात मान मिळू लागला होता. त्याला मानणाऱ्यांची संख्या वाढत होती. याच रागातून जगपाल सिंग याने अर्शदचा काटा काढला असावा, असा संशय आहे. पोलिसांनी आता जगपाल सिंग याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे.

व्हिडीओ कॉलवर शिवजीतनं अर्शदची हत्या केल्याचे दाखवले. त्यानंतर शिवजीतनं जगपालला सांकेतिक भाषेत "काम हो गया", असा इशारा दिला. त्यानंतर पुढे याच व्यक्तीनं हत्येचा लाईव्ह व्हिडीओ मुंबईसह इतर शहरांमधील मूक बधिरांसाठी असलेल्या टीव्ही डिफ व्हिडीओज या ग्रुपवर शेअर केला होता. ही व्यक्ती दुबईतून सूत्रं हलवत असल्याचे अर्शदच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. हत्येच्यावेळी  बेल्जियमच्या मोबाईल क्रमांकावरून 7 मिनिटांचा व्हिडीओ कॉल सुरू असल्याचेही समोर आले होते. 

आणखी वाचा

पोलिसाच्या मुक्या मुलानं सोडवला दादर रेल्वे स्थानकावरील हत्येचा गुंता; कसा लागला गुन्ह्याचा छडा?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Embed widget