एक्स्प्लोर

Mumbai Crime News: 'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...

Mumbai Crime News: मोबाइलच्या माध्यमातून “झिंक फॉस्फाईड” औषध कंपन्या, कॅप्सूल बनवण्याची पद्धत त्यांचे साहित याबाबतची माहिती इंटरनेटवरून गोळा केली होती.

Mumbai Byculla Muharram Poisonous Capsules Case: मुंबईच्या भायखळ्यात मोहरमदरम्यान (Mumbai Byculla Muharram) उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या होत्या. या प्रकरणात आरोपी फैयाज निसार हुसैन प्रेमजी यांच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा समोर आले आहेत. सूडाच्या भावनेतून फैय्याज याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. (Byculla Muharram Poisonous Capsules Case)फैयाज आणि त्याचा भाऊ या दोघांना त्याच्या पत्नींनी सोडून दिले होते. या मागे समाजातील लोकांचा मोठा हात असल्याचा समज त्यांचा होता. यातून समाजाला धडा शिकवण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. तसेच महिनाभरापासून फैयाज या कटाची तयारी करत होता. यासाठी मोबाइलच्या माध्यमातून “झिंक फॉस्फाईड” औषध कंपन्या, कॅप्सूल बनवण्याची पद्धत त्यांचे साहित याबाबतची माहिती इंटरनेटवरून गोळा केली होती. आता या प्रकरणाच्या तपासामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

भायखळामध्ये मोहरम जुलूसमधील विषारी कॅप्सूल प्रकरणात अटकेत असलेला फयाज निसार हुसैन प्रेमजी (वय ३९) याच्या मोबाइलमधून आक्षेपार्ह मजकूर असलेले ई-मेल आणि आंतरराष्ट्रीय व्हॉट्सॲप ग्रुप सापडल्याने पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपास सुरू केला आहे. तसेच त्याने गुन्ह्यात वापरलेले झिंक फॉस्फाईड दिल्लीतील कंपनीतून मागवल्याचेही समोर आले आहे. भायखळा पोलिसांनी आरोपी प्रेमजीला २७ जून रोजी अटक केली होती. सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. या प्रकरणात आणखी एकावर मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Muharram Poisonous Capsules Case: आरोपी प्रेमजीच्या मोबाईलमध्ये आंतरराष्ट्रीय व्हॉट्सॲप ग्रुप

कोठडीत असलेल्या प्रेमजीच्या मोबाइलमध्ये इराण, इराक आणि ओमान देशातील नंबर सापडले असून, त्याने अनेक आंतरराष्ट्रीय व्हॉट्सॲप ग्रुप तयार केल्याचे उघड झाले आहे. पोलिस या नंबरचे तांत्रिक विश्लेषण करत आहेत. दरम्यान, प्रेमजीने विषारी पावडरची खरेदी दिल्लीतील एका कंपनीकडून केली होती, या व्यापाऱ्याचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे.

Muharram Poisonous Capsules Case: पेनकिलरच्या नावाखाली दिलं विषारी औषध

भायखळा पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 5 ते 6 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहे. तर फैयाजचा मोबाईल न्यायवैद्यक प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवला आहे. या साहित्यासाठी त्याने 60 ते 70 हजार रुपये गोळा केले होते. पोलिसांनी त्याच्याजवळून औषध कॅप्सूलमध्ये भरण्यासाठी वापरले जाणारे ट्रे ही जप्त केले असून एकाच वेळी 100 कॅप्सूलमध्ये ही औषध भरता येत होती. मोहरमच्या निमित्ताने भायखळा, डोंगरी, आग्रीपाडा, नागपाडा, मोहम्मद अली रोड येथे मोठ्या प्रमाणात जुलूस निघतात. यावेळी मुस्लिम बांधव प्रति प्रमाणे स्वतःला मारून घेतात. यावेळी शरीरावर होणाऱ्या जखमा यामुळे दुखणे कमी व्हावे, यासाठी त्याने पेनकिलरच्या नावाखाली ही औषध मुंबईच्या डोंगरी येथील तो थांबलेल्या हॉटेलमध्ये बनवली.

फैय्याजकडून 14 हजारहून अधिक कॅप्सूल जरी आढळली असली, तरी त्याहून अधिक कॅप्सूल त्याला बनवायच्या होत्या, मात्र औषध संपले आणि मोहरमच्या जुलूसही दुसऱ्याच दिवशी असल्याने बनलेल्या कॅप्सूल घेऊन तो मोहरमच्या जुलूसमध्ये वाटप करू लागला. मात्र भायखळा पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. 

Muharram Poisonous Capsules Case: फैयाजची मोठी बहिण इराणमध्ये डॉक्टर

फैयाज हा उच्च शिक्षित असून तो काही वर्षे इराणलाही नोकरीसाठी बहिणीकडे गेला होता. फैयाजची मोठी बहिण इराणमध्ये डॉक्टर आहे. तर आईही बहिणीसोबतच राहते. इराणमध्ये 4 वर्षे राहून तेथे अपेक्षित नोकरी न मिळाल्याने 2025 मध्ये फैय्याज भारतात आला. त्यानंतर तो भावासोबत वडिलांच्या कलर पेटींगच्या व्यवसायात त्यांना मदत करत होता. भायखळा पोलिसांच्या तपासात दहशतवादी बाबत कुठलेही फैय्याजचे कनेक्शन आतापर्यंत तरी आढळून आले नाही, मात्र तरीही फैय्याजला अन्य कोणी मदत केली का ? याचाही पोलिस शोध घेत आहेत.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget