इन्स्टावर प्रेम फुललं, 5 मुलं आणि नवऱ्याला सोडून महिला प्रियकरासोबत फरार; पतीची पोलिसांत धाव
Crime News: इन्स्टाग्रामवरुन मैत्री झाली, मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं अन् प्रेम इतकं फुललं की, या महिलेनं आपला पती आणि पाच मुलांना सोडून प्रियकरासह पळ काढला.
![इन्स्टावर प्रेम फुललं, 5 मुलं आणि नवऱ्याला सोडून महिला प्रियकरासोबत फरार; पतीची पोलिसांत धाव mother of 5 children left her husband and went to her lover this is how friendship and love happened on instagram Crime News इन्स्टावर प्रेम फुललं, 5 मुलं आणि नवऱ्याला सोडून महिला प्रियकरासोबत फरार; पतीची पोलिसांत धाव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/30/d5f0a618cdff7516586394af181f71ca1717038608892208_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Crime News: सध्या सोशल मीडिया (Social Media) आपल्या सर्वांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग बनला आहे. सोशल मीडियावरुन अनकेदा आपल्याला जुने मित्रमैत्रिणी भेटतात, तर याच सोशल मीडियामुळे अनेकांना मोठा गंडाही घातल्याचं पाहायला मिळालं आहे. कधी तर सोशल मीडियावरुन अनेकांना आपल्या आयुष्याचा जोडीदारही सापडल्याची अनेक उदाहरण आपण पाहिली आहेत. असंच काहीसं प्रकरण राजस्थानच्या जैसलमेरमध्ये घडल्याचं पाहायला मिळालं आहे. एका महिलेची इन्स्टाग्रामवरुन (Instagram) मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं अन् प्रेम इतकं फुललं की, या महिलेनं आपला पती आणि पाच मुलांना सोडून प्रियकरासह पळ काढला.
राजस्थानच्या (Rajasthan) जैसलमेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 32 वर्षीय महिलेची इंस्टाग्रामवर एका पुरुषाशी मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. प्रेम इतकं फुललं की, महिलेनं पती आणि पाच मुलांना सोडून प्रियकरासह गुजरातला पळ काढला आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. सोमवारी पतीनं आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगानं हलवली आणि महिलेला आपल्या प्रियकरासह गुजरातमध्ये पकडण्यात आलं. त्यानंतर दोघांनाही जैसलमेरला आणलं गेलं.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जैसलमेर जिल्ह्यातील केता गावातील रहिवासी असलेल्या नेमी देवीचे 15 वर्षांपूर्वी जैसलमेर जिल्ह्यातील झिंझिन्याली पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या राम भीलसोबत लग्न झालं होतं. नामी देवी तिच्या डान्सचे रील बनवून रोज इंस्टाग्रामवर पोस्ट करत असे. त्यांचे 40 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते.
बोलणं सुरू झालं, मैत्री झाली अन् मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं
इन्स्टाग्रामवरुन महिलेची ओळख गायक भीमारामसोबत झाली. दोघांमध्ये ओळख झाली, त्यानंतर दोघांनी एकमेकांना आपापले मोबाईल नंबर दिले. दोघांचं फोनवरुन बोलणं सुरू झालं. बघता बघता तासन्तास गप्पा रंगू लागल्या. पाहता पाहता मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दीड वर्षांपासून दोघांचं जीव एकमेकांमध्ये गुंतला होता. त्यानंतर दोघांनीही एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नेमी देवीनं काहीही करुन भीमारामसोबत राहण्याचा निर्णय घेतला. दोघांनी दिवस ठरवला. नेमी देवीनं फतेहगढला जातेय असं सांगून सासरच्या घरातून काढता पाय घेतला. त्यानंतर भीमारामची गाठ घेऊन दोघांनी गुजरातला पलायन केलं. बायको अचानक गायब झाली, त्यामुळे पतीनं बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी नेमी देवीचा शोध सुरू केला. सोमवारी बाडमेर जिल्ह्याच्या मुख्यालयातील पोलीस स्थानकात नेमी देवी आपल्या प्रियकरासोबत हजर झाली. त्यानंतर पोलिसांनी जैसलमेरला याबाबत माहिती दिली.
महिलेचा पतीवर मारहाणीचा आरोप
नेमी देवीनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचं लग्न होऊन 12 वर्ष झाली आणि तिला 5 मुलं आहेत. मात्र तिचा नवरा तिला मारहाण करायचा आणि तिच्यावर सतत संशय घ्यायचा. नवऱ्याच्या संशयी स्वभावाला कंटाळली होती. यावेळी त्यांनी लोकगायक भीमारामशी इन्स्टाग्रामवर बोलणं सुरू केलं. दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि आता लग्न करून आपल्या प्रियकरासोबत राहायचं आहे. प्रियकर भीमाराम सांगतो की, इंस्टाग्राम चॅटिंगद्वारे भेटल्यानंतर आम्ही दोघे गुजरातमधील पालनपूरमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागलो. दोघांच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यानंतर दोघांनी हजर राहणं योग्य मानलं. आम्हाला आता लग्न करून एकत्र राहायचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)