एक्स्प्लोर

हत्या करून तुकडे मिक्सरमध्ये! लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक केले, मीरा रोडमधील थरकाप उडवणारी घटना

Mira Road Crime: लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारिक केले. मुंबईलगतच्या मीरा रोड परिसरात थरकाप उडवणारी घटना उघडकीस

Mira Road Crime News: मिरा रोडमध्ये (Mira Road) माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. लिव इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationship) राहणाऱ्या आपल्या रुम पार्टनरची निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन विल्हेवाट लावण्याची घटना उघडकीस आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेहाचे तुकडे करून आरोपी ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकायचा, ते उकळायचा आणि मग मिक्सरमध्ये बारीक करायचा. हे तुकडे तो पिशवीत भरून इमारतीच्या मागे असलेल्या गटारात फेकून द्यायचा. यासाठी तो त्याच्या बाईकचा वापर करायचा. गुन्ह्यासाठी वापरलेलं सगळं सामान आणि बाईक काल रात्री पोलिसांनी जप्त केलं आहे. 

सध्या आरोपीला पोलिसांनी अटक करुन, घरातील हत्येसाठी वापरण्यात आलेले सर्व साहित्य जप्त केले आहेत. मनोज साने असं या 56 वर्षांच्या आरोपीचं नाव आहे, तर सरस्वती वैद्य असं मृत महिलेचं नाव आहे. ती 32 वर्षांची होती. मीरा भाईंदर उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाशदीप नावाची सोसायटी आहे. तिथला हा सगळा प्रकार आहे. पोलिसांनी सानेला अटक केली आहे. हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले आहेत. 

लिव्ह-इन पार्टनरला आधी मारलं, मग... 

मीरा भाईंदर उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाश दिप बिल्डिंग गीता नगर फेस -7, जे विंग सदनिका क्रमांक 704 मध्ये मागच्या तीन वर्षांपासून एक जोडपं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतं. त्यात मनोज साने (वय 56) आणि मयत सरस्वती वैद्य (वय 32) हे दोघं राहत होते. त्याच इमारतीत राहणाऱ्या शेजारच्या लोकांना दुर्गंधी येत असल्यानं त्यांनी नयानगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात माहिती देऊन तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ तक्रारीची दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी गेल्यानंतर पोलिसांनी दुर्गंधी येणाऱ्या घरात प्रवेश केला. त्यानंतर जे समोर आलं ते खरंच हादरवणारं होतं. 

पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं. याप्रकरणी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची नयानगर पोलीस ठाण्यात प्रक्रिया सुरू आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पंखा आणि प्रेशर कुकरचा वापर केला. त्यानंतर सर्वात आधी आरोपीनं आपल्या लिव्ह इन पार्टनरचे तुकडे केले. कटर मशीनच्या मदतीनं मृतदेहाचे तुकडे केल्याची कबुली आरोपीनं पोलिसांना दिली. त्यानंतर ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये उकडले आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक केले.  

हत्येसाठी वापरण्यात आलेलं साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही हत्या का करण्यात आली याची माहिती चौकशीनंतर समोर येईल. दरम्यान, महिलेचा खून दोन ते तीन दिवसांपूर्वी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शेजाऱ्यांनी दुर्गंधी येत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. तेव्हा पोलिसांनी हा फ्लॅट उघडला आणि त्यानंतर जे धक्कादायक चित्र समोर आलं ते पाहुन सर्वांनाच धक्का बसला. सध्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
Sangli News: थेट नगराध्यक्ष लढतीसाठी जयंत पाटलांकडून राज्यातील पहिला उमेदवार जाहीर; नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले
थेट नगराध्यक्ष लढतीसाठी जयंत पाटलांकडून राज्यातील पहिला उमेदवार जाहीर; नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले
राज ठाकरेंनी संघाचा म्हणत प्रवीण परदेशीला झापलं; मुळशी पॅटर्न फेम अभिनेता पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंनी संघाचा म्हणत प्रवीण परदेशीला झापलं; मुळशी पॅटर्न फेम अभिनेता पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
निवडणुकीला महायुती फिस्कटली, नितेश राणेंमुळेच सिंधुदुर्गात युती नाही; दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं
निवडणुकीला महायुती फिस्कटली, नितेश राणेंमुळेच सिंधुदुर्गात युती नाही; दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Scam: 'शासकीय जमिनीचा अपहार झाला', पार्थ पवार प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे आदेश
Pawar Land Deal : 'पार्थ पवारांच्या जमीन कागदपत्रांमध्ये गंभीर चुका', सामाजिक कार्यकर्ते Vijay Kumbhar यांचा आरोप
Maharashtra Politics: 'ठाकरेंनी ऐकवली फडणवीस, पवारांची ऑडिओ क्लिप, कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण
Maharashtra Politicsलायकी नसलेला माणूस आमदार, Ramesh Kadam यांचा आमदार Raju Khare यांच्यावर हल्लाबोल
Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल,फडणवीसांचा ठाकरेंना सणसणीत टोला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
Sangli News: थेट नगराध्यक्ष लढतीसाठी जयंत पाटलांकडून राज्यातील पहिला उमेदवार जाहीर; नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले
थेट नगराध्यक्ष लढतीसाठी जयंत पाटलांकडून राज्यातील पहिला उमेदवार जाहीर; नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले
राज ठाकरेंनी संघाचा म्हणत प्रवीण परदेशीला झापलं; मुळशी पॅटर्न फेम अभिनेता पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंनी संघाचा म्हणत प्रवीण परदेशीला झापलं; मुळशी पॅटर्न फेम अभिनेता पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
निवडणुकीला महायुती फिस्कटली, नितेश राणेंमुळेच सिंधुदुर्गात युती नाही; दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं
निवडणुकीला महायुती फिस्कटली, नितेश राणेंमुळेच सिंधुदुर्गात युती नाही; दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: इतके दिवस काय केलं, पद सोडून द्या, काम न करणाऱ्यांना काढून टाका; पुण्यात राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम
इतके दिवस काय केलं, पद सोडून द्या, काम न करणाऱ्यांना काढून टाका; पुण्यात राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम
Eknath Khadse demand Ajit Pawar Resignation : कथित जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी होईपर्यंत अजित पवारांनी राजीनामा द्यावा, एकनाथ खडसे यांची मोठी मागणी
पार्थ पवार यांच्या कंपनीची जमीन खरेदी वादात, चौकशी होईपर्यंत अजित पवारांनी राजीनामा द्यावा : एकनाथ खडसे
Anil Deshmukh On Vote Chori: मध्य प्रदेशातून भाजपनं कार्यकर्ते आणले, काटोल-नरखेड मतदारसंघात 35000 मतांची चोरी; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
मध्य प्रदेशातून भाजपनं कार्यकर्ते आणले, काटोल-नरखेड मतदारसंघात 35000 मतांची चोरी; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी तहसीलदारांचे तात्काळ निलंबन, मुख्यमंत्र्यांचे आदेश
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी तहसीलदारांचे तात्काळ निलंबन, मुख्यमंत्र्यांचे आदेश
Embed widget