धक्कादायक! वयोवृद्ध महिलेला ओलीस ठेवून लाखांचे दागिने लंपास; दैव बलवत्तर म्हणूनवाचले प्राण
Mira Road Crime News : मिरा रोडच्या लक्ष्मी पार्क देवदर्पण सोसायटीमधील 72 वर्षीय वयोवृद्ध महिलेला चोरट्याने तब्बल आठ तास ओलीस ठेवून त्यांच्याकडून 5 लाख रुपयांचे सोन्याचे कडे लुटले आहे.
Mira Road Crime News : मिरा रोडच्या लक्ष्मी पार्क देवदर्पण सोसायटीत भीषण घटना घडली आहे. या घटनेत 72 वर्षीय वयोवृद्ध महिला फातिमा युसूफ ज्वाले यांना चोरट्याने तब्बल आठ तास ओलीस ठेवून त्यांच्याकडून 5 लाख रुपयांचे सोन्याचे कडे लुटले आहे. चोरट्याने विजतज्ञ असल्याचे भासवत संध्याकाळी 9 वाजता त्यांच्या घरात प्रवेश केला. त्याने दार उघडल्यावर चाकू दाखवत महिलेला बेडरूममध्ये कोंडले. दरम्यान, चोरट्याने त्यांना मारहाण करत त्यांच्याकडून दागिने काढून घेतले. ही सर्व घटना उशिरा लक्ष्यात आल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे प्रकरणातील चोरटा रात्रीभर घरातच थांबला आणि पहाटे 5 वाजता पळून गेला. घटनेचा उलगडा सकाळी झाला, जेव्हा फातिमा ज्वाले यांच्या पुतणीने त्यांना गंभीर अवस्थेत पाहून पोलिसांना कळवले.
नातेवाईकांची सुरक्षेच्या अभावावर नाराजी
मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीत सुरक्षा रक्षक नसल्याने आणि मुख्य गेट बंद असल्यामुळे चोरट्याला घटनास्थळी अधिक वेळ थांबता आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. नातेवाईकांनी सुरक्षेच्या अभावावर नाराजी व्यक्त केली आहे. मिरा रोड पोलिसांनी या प्रकरणी बीएनएस कलम ३०९(६) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे.
अवैधरीत्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बंगाली तरुणाला अटक
खामगाव शहरातील जुनाशहर परिसरात अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बंगाली तरुणाला रात्री पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे. कौशिक टीकादार अस या तरुणाचं नाव असून गेल्या अनेक महिन्यांपासून कुठलीही अधिकृत वैद्यकीय पदवी किंवा परवाना नसताना हा तरुण रुग्णांवर उपचार करत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. यावरून रात्री उशिरा कारवाई करत या तरुणाला अटक करत पोलिसांनी अवैधरित्या थाटलेल्या क्लिनिकच सर्व साहित्य जप्त केल आहे. याबाबत मात्र जिल्हा आरोग्य प्रशासन अनभिज्ञ असून जिल्ह्यात अद्यापही ५०० च्या वर अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणारे दवाखाने थाटून आहेत . मात्र गेल्या दहा वर्षापासून कुठल्याही अवैध वैद्यकीय व्यावसायिकावर आरोग्य विभागाने कारवाई केलेली नाही.
अंगावर भिंत कोसळून सहा कामगार जखमी
रायगडच्या खोपोली मधील उंबरे गावाजवळ एका खाजगी कंपनीच्या भिंतीच काम सुरू असताना अंगावर मातीचा ढिगारा कोसळून या परीसरात काम करणारे एकून 6 कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे.काम सुरू असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळला आणि हे कामगार या ढिगाऱ्याखाली अडकले मात्र जेसीबीच्या साहाय्याने या सर्व कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. काल सायंकाळी ही घटना घडली सर्व जखमींना खालापूर मधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये धर्मदेव,राकेश राजभार, मंजित चौहान, जितेंद्र, राम समुज, प्रेम सागर. अशी नावे आहेत सर्व राहणार उत्तर प्रदेश.
हे ही वाचा