एक्स्प्लोर

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! मिरा रोडमध्ये तब्बल दोन कोटीचे अंमली पदार्थ जप्त; विदेशी महिलेलाही अटक

मुंबई पोलिसांच्या कारवाईला मोठे यश आले आहे. पोलिसांनी वसई विरार पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी विभागाने एक भारतीय इसमासह विदेशी महिले कडून दोन कोटीहून अधिकचे अंमली पदार्थ जप्त केलेय.

मिरा रोड Crime News : मुंबई पोलिसांच्या कारवाईला मोठे यश आले आहे. पोलिसांनी वसई विरार पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी विभागाने एक भारतीय इसम आणि विदेशी महिला कडून दोन कोटीहून अधिकचे अंमली पदार्थ जप्त केलं आहे. अंमली पदार्थविरोधी कारवाईत पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई (Crime) केली आहे. काशिगाव या ठिकाणी ही कारवाई केली असून  यात एक भारतीय पुरुष आणि एक विदेशी महिला असे  दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांच्या कडे तब्बल 2 कोटी 18 लाख रुपये किमंतीचा 1 किलो 90 ग्रॅम एम.डी. हा अंमली पदार्थ मिळाला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आणखी काही गुप्त माहिती समोर येण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

विदेशी महिलेसह एकाला अटक 

या प्रकरणातील संशयित आरोपी पुरुष हा 35 वर्षाचा असून त्याच्या सोबतची संशयित आरोपी ही 35 वर्षाची दक्षिण आफ्रिकी वंशाची महिला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे.  त्यांच्यावर कलम  22, 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अंमली विरोधी पथक पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून या प्रकरणात आणखी काही खुलासे होतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

मीरा भाईंदरमध्ये  स्लैब कोसळल्याच्या दोन घटना 

मीरा भाईंदर मध्ये आज स्लैब कोसळल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. यात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. मीरारोड पूर्वच्या आर. एन. ए. ब्रॉड वे या इमारती मधील ए विंग रुम नंबर 17 या घराचा स्लैब कोसळलाय. सोबतच भाईंदरच्या  बी.पी. रोड येथील एका दुकानाचा काही भाग पडल्याची घटना घडली आहे. यात घराचे आणि  दुकानाचे मोठे नुकसान झाले असून, कोणतीही जीवितहानी झालेली नाहीय. मात्र मीरारोड घटनेत एका महिलेला मार लगल्याची माहिती समोर येत आहे. तर भाईंदरच्या बी.पी. रोड येथे एका दुकानाचा सज्जा कोसळल्याने दुकानातील सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडले

वसईच्या नायगाव पूर्वेच्या टीवरी राजावळी रस्त्यालगत ॲक्सिस बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले आहे. बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. यात चोरट्यांनी 4 लाख  30 हजारांची रोकड लंपास केली आहे. नायगाव पूर्वेच्या टीवरी राजावळी रस्त्यालगत नवकार फेज थ्री इमारत आहे. या इमारतीत ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश करून गॅस कटरच्या सहाय्याने हे एटीएम फोडले. यातील चार लाख 29 हजार 700 इतकी रोकड लंपास केली आहे. 

या प्रकरणी, नायगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. एटीएम फोडताना त्या ठिकाणी दोन व्यक्ती असल्याचे समजले आहे. मात्र आणखी त्याचे साथीदार सोबत असण्याची शक्यता आहे. त्याचाही तपास सुरू असल्याची माहिती नायगाव पोलिसांनी दिली. यापूर्वीसुद्धा वसई विरारमध्ये एटीएम फोडीच्या घटना घडल्या आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune : पुण्यात क्रौर्याची परिसीमा गाठली, शिलाई मशीनच्या कात्रीनं पतीने पत्नीची हत्या केल्याची घटनाNanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरणShivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजनWalmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
Embed widget