एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhajinagar Crime: आधी मुलीला त्रास देऊन आत्महत्या करायला भाग पाडलं, आता आरोपी तिच्या कुटुंबीयांना म्हणतात, 'आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल'

Chhatrapati Sambhajinagar news: राज्यात कायदा-सुव्यवस्था उरली आहे की नाही, असा प्रश्न छत्रपती संभाजीनगरमधील घटनेमुळे निर्माण झाला आहे. याठिकाणी मुलीच्या आत्महत्येला कारणीभूत असलेले आरोपी मुलींच्या कुटुंबीयांना धमकावत असल्याचा प्रकार समोर आला.

छत्रपती संभाजीनगर: येथील ओहर गावात काही दिवसांपूर्वी एका मुलीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या काही आरोपींनी मुलीच्या कुटुंबीयांना जाहीरपणे धमकावल्याचा चीड आणणारा प्रकार समोर आला आहे. यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्था उरली आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 18 ऑगस्ट रोजी ओहर गावात मेकॅनिक असलेल्या कासिम यासीन पठाण या तरुणाच्या धमक्यांना कंटाळून पूजा शिवराज पवार (वय 16) हिने आत्महत्या (Suicide) केली होती. याप्रकरणी पोलिसांनी काहीजणांना ताब्यात घेतले होते. मात्र, याप्रकरणातील उर्वरित मोकाट आरोपी हे पूजा पवार हिच्या कुटुंबीयांना धमकावत असल्याचा व्हीडिओ समोर आली आहे. 

पोलिसांनी याप्रकरणात 7 जणांवर गुन्हा नोंदवला होता, पण केवळ दोघांनाच अटक करण्यात आली होती. मोकाट असलेल्या उर्वरित आरोपींनी आता पूजाच्या कुटुंबीयांना धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी तिच्या घरासमोर येऊन कुटुंबीयांना चाकू आणि तलवारी दाखवून धमकावले. या आरोपींना कायद्याचा जराही धाक उरलेला नाही. यापैकी एकजण जाहीरपणे म्हणत होता की, 'आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल'. याचा अर्थ पोलिसांनी आपल्याला पकडले तरी काही दिवसांत जामीन घेऊन बाहेर येऊ, असा तगडा आत्मविश्वास या आरोपींना आहे. त्यामुळे राज्यातील गुन्हेगारांना पोलिसांचा वचक उरला आहे की नाही, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. 

दरम्यान, या सगळ्या प्रकारामुळे पवार कुटुंबीय दहशतीखाली आहेत. आज या प्रकरणात उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी छत्रपती संभाजी नगर शहरातील हर्सूल टी पॉइंटवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. 

नेमका प्रकार काय?

पूजा पवार ही अल्पवयीन तरुणी जटवाडा रोडवर असलेल्या ओहर गावात राहत होती. याच गावातील गॅरेजमध्ये काम करणारा कासिम यासीन पठाण हा तरुण तिला त्रास देत होता. गेल्या आठ महिन्यांपासून तो पूजाच्या मागे लागला होता. माझ्यावर प्रेम कर.... असा तगादा त्याने पूजाच्या पाठीशी लावला होता. पूजा या सगळ्याला कंटाळली होती. पूजा रक्षाबंधनासाठी गावी आली होती तेव्हा तिने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. पूजाच्या कुटुंबीयांनी कासिम यासीन पठाणला समजही दिली. मात्र, त्यानंतरही कासिम पठाणने पूजाला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यामुळे पूजाने टोकाचे पाऊल उचलले. 18 ऑगस्टला तिने गावातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली होती. यानंतर आता आरोपी तिच्या कुटुंबीयांना धमकावत आहेत. त्यामुळे आता पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

आणखी वाचा

माझ्यावर प्रेम कर, नाहीतर...; तरुणाच्या त्रासाला कंटाळून संभाजीनगरमध्ये 16 वर्षीय मुलीने आयुष्य संपवलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray interview :…म्हणून राज ठाकरेंसोबत युती नाही!   उद्धव ठाकरेंची बेधडक मुलाखतPriyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषणDilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
×
Embed widget