Manohar Mama Bhosale News: जामिनावर सुटलेल्या मनोहर मामाचे हादरवणारे कांड; त्याला फसवलं आणि बिंग फुटलं, नेमकं काय घडलं?
Manohar Mama Bhosale News: स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याला सोलापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Manohar Mama Bhosale News: भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याचे प्रकरण ताजे असताना स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणवून घेणारा आणि भविष्य बदलवण्याचे आमिष दाखवत भक्तांची फसवणूक करणारा स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा (Manohar Mama Bhosale) याला सोलापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मनोहर भोसलेवर याआधी आर्थिक फसवणूक, भोंदूगिरीसह बलात्कार सारखे 3 गंभीर गुन्हे दाखल होते. आधीच्या 3 गुन्ह्यात जामीनावर असलेला मनोहर मामा पुन्हा एकदा आर्थिक फसवणूक प्रकरणात पोलिसांच्या कोठडीत आहे. (Manohar Mama Bhosale Crime News)
मनोहर मामाचं बिंग कसं फुटलं? (Manohar Mama Bhosale Case)
कुडूवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीसह जादुटोणाविरोधी कलमान्वये गुन्ह्याबद्दल फिर्याद दिलेला तक्रारदार गौतम कसबे हा रिअल इस्टेट धारक असून आपल्या व्यवसायामध्ये वारंवार येणाऱ्या अपयशामुळे मनोहर भोसले यांच्या संपर्कात आला. या दरम्यान मनोहर याने पूर्जा-अर्चा केल्यास संकटे दूर होतील आणि व्यवसायात प्रगती असे सांगून 2 लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी 50 हजार रुपये त्याला दिले. परंतु यानंतरही त्याच्या व्यवसायात फारशी सुधारणा झाली नाही. अखेर त्याने कुडूवाडी पोलीस ठाणे गाठून मनोहर भोसले याच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानंतर मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे या दोघांना ताब्यात घेऊन कुडूवाडी पोलीसांनी बेड्या ठोकल्या.
मनोहर भोसलेने पीडित महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले- (Manohar Mama Bhosale Case)
2021 साली एका महिलेने मनोहर भोसले विरुद्ध अत्याचार केल्याची तक्रार दिली. सिरीयलमध्ये काम मिळवून देतो असे आमिष दाखवून मनोहर भोसले याने पीडित महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसचं तिची आर्थिक फसवणूक ही केली. या महिलेच्या तक्रारीवरून सोलापूरच्या करमाळा पोलिसांत भोसले विरोधात गुन्हा नोंद झाला. या प्रकरणत त्याला अटक ही झाली होती. आणि काही महिने त्याने तुरुंगवास ही भोगला. मात्र त्यानंतर तो या प्रकरणात जामीनावर बाहेर आहे.
माझी भक्ती करा तुमच्या मणक्याचे आजार बरे करतो सांगून फसवणूक- (Manohar Mama Bhosale)
2021 मध्ये बारामती येथील रुग्णाचे कॅन्सर बरे करतो असे सांगून मनोहर भोसले याने फसवणूक केली होती. रुग्णाला विविध प्रकारचे औषध देऊन तसेच पूजा घालून बरे करतो असे सांगत जवळपास 2 लाख 51 हजर रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी देखील त्याच्यावर बारामती पोलिसांत महाराष्ट्र जादू टोणा प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय पुणे ग्रामीण येथील दौंड पोलिसात देखील मनोहर भोसले विरोधात फसवणूकीचा गुन्हा नोंद आहे. माझी भक्ती करा तुमच्या मणक्याचे आजार बरे करतो असे सांगून त्याने भक्ताकडून 50 हजार रुपये घेतलं होते. मणक्याचे त्रास बरे न झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने दौंड पोलिसांत मनोहर भोसले विरोधात गुन्हा नोंद केला. विविध गुन्हे दाखल झाल्यानंतर सोलापुरातल्या उंदरगाव येथील आश्रम देखील बेकायदेशीर असल्याची माहिती समोर आली होती. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर उंदरगांव येथील हे आश्रम बंद पडले. त्यानंतर त्याने त्याचा कारभार पुण्याला हलवलं होता. पुण्यातूनचं तो आपला हा सगळा भोंदूगिरीचा कारभार चालवत होता. (Manohar Mama Bhosale Crime News)
कोण आहे मनोहर मामा? (Who Is Manohar Mama Bhosale)
- इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावातला मूळचा रहिवासी
- डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आठवडा बाजारात सुके बोंबील विकून उदरनिर्वाह करत होता
- एक दिवस तो अचानक गायब झाला आणि काही वर्षानंतर आपल्याला संत बाळूमामा प्रसन्न असून त्यांचा आशीर्वाद असल्याचे सांगितले
- करमाळा तालुक्यातील उंदरगाव परिसरात त्याने स्वतःचा मठ थाटला होता
- साक्षात बाळूमामा येत असल्याचे ऐकल्यानंतर अमावस्या पौर्णिमेला त्याच्याकडे भक्ताची मोठी गर्दी होऊ लागली
- अनेक मोठ्या नेत्यासोबत देखील मनोहर मामा याचे फोटो आहेत.
- अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते या मामाच्या सल्ल्यासाठी गर्दी करायचे अशी चर्चा आहे.
- या आधी त्याच्यावर महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणात सोलापुरातील करमाळा पोलिसात गुन्हा दाखल आहे.
- तसेच कर्करोग बरा करतो म्हणून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बारामतीत तर मणक्याचे आजार बरे करतो म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी दौंड पोलिसांत गुन्हा नोंद आहे.
- 2021 मध्ये 3 गुन्हे दाखल झाल्यानंतर देखील त्याने आपली भोंदूगिरी सुरूच ठेवली होती.
सोलापुरातील भोंदू मनोहर भोसलेला अटक, VIDEO:
संबंधित बातमी:






















