70 लाखांना विकणार होते मांडूळ साप, सापळा रचून पोलिसांनी पाच जणांना केली अटक
Crime News: काळा जादू करण्यासाठी मांडूळ जातीचा साप 70 लाखांना विकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या टोळीला सापळा रचत कल्याणच्या डीसिपी स्कोडने अटक केली आहे.
Crime News: काळा जादू करण्यासाठी मांडूळ जातीचा साप 70 लाखांना विकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या टोळीला सापळा रचत कल्याणच्या डीसिपी स्कोडने अटक केली आहे. मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या पाच ही जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यांच्या एक साथीदार निसटण्यात यशस्वी झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. खडकपाडा पोलिसांनी मांडूळ साप जप्त केला आहे. हा साप कुणाला विकण्यासाठी आणला होता. या टोळीने आणखी किती लोकांना मांडूळ साप विकले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. निलेश हीलिम, चेतन कांबळे, अरविंद पंडित, विशाल ठाकरे, अनिल काटे अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर त्यांचा साथीदार मधुकर हा पसार झाला आहे.
मांडूळ प्रजातीचा साप हा झटपट श्रीमंत होण्यासह अनेक अंधश्रद्धेपोटी मांडूळ सापाची तस्करी गेल्या काही वर्षापासून वाढत आहे. कल्याणचे डीसिपी सचिन गुंजाळ यांना पालघर येथे राहणारे काही जण मांडूळ साप विकण्यासाठी कल्याणला येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण डीसीपी स्कोडचे संजय पाटील, ऋषिकेश भालेराव, सदाशिव देवरे व खडकपाडा पोलिसांच्या पथकाने रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अग्रावाल कॉलेज जवळ सापळा रचला. या दरम्यान तीन दुचाकीवरून सहा जण येताना पोलिसांना दिसले. डीसीपी स्कोडच्या पथकाला संशय आल्याने त्यांनी या सहा जणांना हटकलं. त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला.
पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता पोलिसांना त्यांच्याकडे मांडूळ साप आढळला. चौकशी दरम्यान हा साप ते 70 लाखांना विकणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या दरम्यान सहा जणांमधील एका इसम निसटण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी निलेश हीलिम, चेतन कांबळे, अरविंद पंडित, विशाल ठाकरे, अनिल काटेला यांना अटक केली. तर त्यांचा साथीदार मधुकर हा पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. हे सर्व आरोपी पालघर परिसरात राहणारे आहेत. त्यांनी हा साप कुठून व कुणाला विकण्यासाठी आणला होता, त्यांनी अशा प्रकारे या आधी देखील सापांची विक्री केली आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
इतर बातम्या:
RPF Nagpur : 13 लाखांच्या मुद्देमालासह मुंबईच्या चोरट्याला नागपुरात अटक
UP Crime : मुलीला वाचवण्यासाठी आई बनली 'दुर्गा', अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्याचं गुप्तांग कापलं