एक्स्प्लोर

UP Crime : मुलीला वाचवण्यासाठी आई बनली 'दुर्गा', अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्याचं गुप्तांग कापलं

Lakhimpur Rape Attempt : उत्तर प्रदेशमध्ये एका महिलेनं तिच्या 14 वर्षीय मुलीवर अत्याचाराच्या प्रयत्न करणाऱ्या युवकाचं गुप्तांग कापल्याची घटना घडली आहे.

Woman Cut Off Private Part of Young Man : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) लखीमपूर खीरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची (Rape Attempt) धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी एका आईनं चंडीचं रुप धारण केलं. एका महिलेनं आपल्या मुलीवर बलात्कार करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या युवकाचं गुप्तांग कापल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमधील हा प्रकार समोर आला आहे. मुलीवर अत्याचार करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीवर हल्ला करत मुलीच्या आईनं त्याचं गुप्तांगच कापलं. यामध्ये आरोपी गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. महिलेच्या तक्रारवरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

जखमी अवस्थेत रुग्णालयात पोहोचला तरुण

मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना लखीमपूर खीरी जिल्ह्यातील कमलापुरी येथे घडली आहे. हरिशंकर या तरुणाला बुधवार जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी त्यानं सांगितलं की, महिलेनं दोन जणांसोबत मिळून त्याला मारहाण केली आणि गुप्तांग कापलं. यानंतर महिला पोलिसांसमोर हजर झाली. महिलेनं पोलिसांत तक्रार दिली की, तरुण जबरदस्ती घरात घुसून तिच्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यामुळे महिलेना मुलीचा बचाव करताना युवकावर हल्ला करत त्याचं गुप्तांग कापलं. ही घटना 17 ऑगस्ट रोजी घडली आहे. 
 
आरोपी महिलेचा लिव्ह-इन पार्टनर

काही मीडिया रिपोर्टनुसार, आरोपी तरुण 36 वर्षीय महिलेचा लिव्ह-इन पार्टनर असल्याचं बोललं जातं आहे. ही महिला मुलीला घेऊन पतीपासून वेगळी राहत होती, असं म्हटलं जात आहे. एका रिपोर्टनुसार, महिला शेतात काम करण्यासाठी गेली असता, आरोपी जबरदस्तीनं घरात घुसला आणि त्यानं मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. इतक्यात महिला घरी पोहोचली आणि तिच्या हा प्रकार लक्षात आला. तिने आरोपीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेनं तरुणावर धारदार शस्त्रानं वार करत त्याचं गुप्तांग कापलं.

आरोपीविरोधात 376 आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद

लखीमपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला दोन वर्षांपासून पतीपासून वेगळी राहत आहे. तिचा नवरा दारुडा असल्याने ती मुलीला घेऊन वेगळी राहत आहे. महिलेच्या तक्रारी वरून तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात 376 आणि पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी बरा झाल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली जाईल, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget