Mumbai Crime News : अमृता फडणवीस यांना फेसबुकवर शिवीगाळ; ठाण्यातील महिला अटकेत
Mumbai Crime News : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना फेसबुकवर शिवीगाळ करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे.
Maharashtra Mumbai Crime News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना फेसबुकवर (Facebook) शिवीगाळ केल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र सायबर (Maharashtra Cyber Police) पोलिसांनी ही कारवाई केली. स्मृती पांचाळ असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून पोलिसांनी आरोपी महिलेचा मोबाईल (Mobile) जप्त केला आहे. ठाणे जिल्ह्यातून पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे.
7 सप्टेंबर रोजी फेसबुकवर एका महिलेनं अमृता फडणवीस यांच्या फेसबुक पोस्टच्या (Amruta Fadnavis Facebook Post) खाली अपशब्द लिहित कमेंट केली होती. महिलेनं केवळ एक नाहीतर एकापाठोपाठ एक अशा चार पोस्ट केल्या होत्या. या पोस्ट्स आक्षेपार्ह्य भाषेत (offensive language) लिहिण्यात आल्या होत्या. त्यातील मजकूर आक्षेपार्ह्य भाषेत होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आयपीसी कलम 419, 468, 469, 504, 505 (1)(सी), आणि 509 आणि कलम 67, 66 (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील सर्व गुन्हे सायबर पोलिसांनी आयटी अॅक्ट अंतर्गत दाखल केले आहेत.
सायबर पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, महिलेनं आपली ओळख लपवण्यासाठी 'गणेश कपूर' नावाचं खोटं फेसबुक प्रोफाइल तयार केलं होतं. या अकाउंटचाच वापर महिलेनं अमृता फडणवीस यांच्या पोस्टवर आक्षेपार्ह्य कमेंट करण्यासाठी केला होता. आरोपी महिलेला आज कोर्टात हजर करण्यात आलं असून 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :