(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Kalyan Crime News : ठेकेदाराला खंडणीसाठी धमक्या, कामगारांचे अपहरण करत मारहाण
Maharashtra Kalyan Crime News : रेल्वे ठेकेदाराला खंडणीसाठी धमक्या दिल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे.
Maharashtra Kalyan Crime News : रेल्वे ठेकेदाराला खंडणीसाठी धमक्या दिल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. या कर्मचाऱ्याला धमकी देतानाचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खंडणीसाठी धमक्या दिल्यानंतर अपहरणही करण्यात आले. या प्रकरणी कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
रेल्वे ठेकेदाराला 10 लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकावत पैसे न दिल्याने ठेकेदाराच्या पाच कामगारांना कोंडून ठेवत बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना कल्याण कोळशेवाडी परिसरात घडली होती. या प्रकरणी खंडणी मागणाऱ्या विजय कदम याच्यासह त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळसेवाडी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी विजय व त्याचा साथीदार यश जगताप याला अटक करण्यात आली असून त्यांचा साथीदाराचा शोध सुरू आहे. दरम्यान विजय कदम हा ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याला धमकावत असल्याचा व्हिडियो देखील समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कल्याण पूर्वेकडील आनंदवाडी परिसरात रेल्वे यार्डात संरक्षण भिंतीचे काम रेल्वेच्या ठेकेदाराकडून सुरू आहे. काम सुरू असलेल्या ठिकाणी येत ठेकेदाराला धमकावत दमदाटी करत विजय कदम याने खंडणीची मागणी केली. पहिल्या वेळी 5 हजार रुपयांची खंडणी नेहल्यानंतर कदम वारंवार ठेकेदाराला धमकावत खंडणीची मागणी करत होता. मात्र ठेकेदार प्रतिसाद देत नसल्याने त्याने ठेकेदाराला कामासाठी आणलेले साहित्य जेसीबी मशीन जाळून टाकण्याची धमकी दिली होती. मात्र तरीही या धमक्याकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने विजय कदम याने साईटवर काम करणाऱ्या ठेकेदाराच्या पाच कामगारांना पळवून नेले. या कामगारांना आनंदवाडी येथील रेल्वेच्या बंद क्वार्टर्स मध्ये कोंडून ठेवत बेदम मारहाण केली. या कामगारांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तेथून पळ काढला. या प्रकरणी ठेकेदाराच्या तक्रारीनंतर कोळसेवाडी पोलीसानी गुन्हा दाखल केला. त्यानंतर विजय कदम व यश जगताप या दोघांना अटक केली आहे. अन्य दोघांचा शोध सुरू असून या प्रकरणी पुढील तपास सुरु असल्याचे कोळशेवाडी पोलिसांनी सांगितले आहे.