(Source: ECI/ABP News/ABP Majha)
crime: पोलीस कर्मचाऱ्यावरच अत्याचाराचा गुन्हा, घटस्फोटीत महिलेला लग्नाचे आमिष देत फसवले अन्...
आता मी तुझी बायको आहे. मला दरमहा खर्चासाठी पैशांची मागणी करताच या कर्मचाऱ्याने या महिलेशी संपर्क तोडल्याचं तिनं सांगितलं.
Yavatmal Crime: घटस्फोटीत महिलेला लग्नाचे आमिष देऊन फसवल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यावरच अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळच्या लोहारा पोलीस ठाण्यात या महिलेने तक्रार दिली असून लग्नाचे आश्वासन देत गळ्यात मंगळसूत्रही घातल्याचे या महिलेने सांगितले. आता मी तुझी बायको आहे. मला दरमहा खर्चासाठी पैशांची मागणी करताच या कर्मचाऱ्याने या महिलेशी संपर्क तोडल्याचं तिनं सांगितलं. या प्रकरणी अवधूत वाडी पोलीस ठाण्यात घटस्फोटीत महिलेने तक्रार दिली असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. इमरान अजीज पठाण असे अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेल्या पोलीस चालक कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
नक्की झाले काय?
घटस्फोटित महिला 2021 मध्ये कौटुंबिक न्यायालयात तारखेवर येत असताना तिची ओळख इमरान पठाण यांच्यासोबत झाली होती. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. मैत्री व नंतर प्रेमात रुपांतर झाले. आयुष्यभर साथ देईन. तुझ्याशी लग्न करेन असे आश्वासन देत या कर्मचाऱ्यानं महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र ही घातले होते.
खर्चाची मागणी करताच संपर्क तोडला
यानंतर या महिलेने मी तुझी बायको आहे मला दरमहा खर्चाची मागणी करतात या पोलीस कर्मचाऱ्यांनी या महिलेची बोलणे बंद केले. इम्रान पठाण यांच्याशी संपर्क केला असता कुठलाही प्रतिसाद या महिलेला मिळाला नाही. त्यामुळे अवधूत वाडी पोलीस ठाण्यामध्ये येत महिलेने इम्रान पठाण यांच्याविरुद्ध 2021 ते जून 2024 या कालावधीत लग्नाची हमी देत अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. या महिलेच्या तक्रारीवरून या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस कर्मचारी इम्रान पठाण फरार असून पुढील तपास अवधूत वाडी पोलीस ठाणे करीत आहे.
पोटच्या मुलीवर वर्षभरापासून लैंगिक अत्याचार
सांस्कृतीक शहर अशी ओळख असणाऱ्या पुण्यातून गुन्हेगारीच्या मोठ्या घटना समोर येत आहेत. असं असतानाच बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना पुणे शहरात घडली आहे. पुण्यातील वारजे परिसरात राहणाऱ्या एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवरच तब्बल एक वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. तर या घटनेचा उलगडा शाळेतील गुड टच बॅट टच उपक्रमातून उघडकीस आला आला आहे. हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर नराधम बापाला पुणे पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा: