एक्स्प्लोर

Kurla Bus Accident : कुर्ला बस अपघातामुळे कित्येकांची आयुष्यं उद्ध्वस्त; कुणी आई गमावली, तर कुणी भाऊ, तर कुणी पोटची पोरं...

Kurla Bus Accident : कुर्ल्यातल्या बेस्ट बसच्या अपघातात सात निष्पापांचा जीव गेला. या अपघातात कुणी आपली मुलं गमावली, तर कुणी आपली आई. त्या कुटुंबात अवघ्या एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

Kurla BEST Bus Accident : मुंबईतल्या (Mumbai News) कुर्ल्यामध्ये काल रात्री नऊच्या सुमारास झालेल्या बेस्ट बसच्या अपघातानं अवघा महाराष्ट्र हादरला. कुर्ला एलबीएस मार्गावरून भरधाव वेगानं जाणाऱ्या बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटून एक भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा जीव गेला तर 49 जण गंभीर जखमी झाले. त्याशिवाय बसच्या धडकेनं रस्त्यावरच्या 20-22 वाहनांचंही मोठं नुकसान झालं. या अपघातानंतर आता आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालंय. हा अपघात नेमका का घडला? त्यात दोषी कोण? या प्रश्नांच्या उत्तराचा शोध सुरु झाला आहे. या अपघातामुळं बेस्ट प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. 

हे सगळं खरं असलं तरीसुद्धा अपघातात 7 निष्पापांनी जीव गमावला, तर तब्बल 48 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी अनेकजण अत्यवस्थ आहेत. त्या दिवशी जेव्हा या 7 जणांनी घर सोडलं असेल, त्यावेळी तो आपल्या कुटुंबीयांसोबतचा शेवटचा क्षण असेल असा विचारही आला नसेल. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या 7 जणांमध्ये कुणा आई होती, तर कुणाचा भाऊ, कुणाचे वडील होते, तर कुणी पोटची पोरं गमावली. पण याची जबाबदारी कुणाची? मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी कुणी कामावरुन घरी परतत होतं. तर कुणी झेरॉक्स आणण्यासाठी गेलं होतं. मुलगी आणि वडील एका ठिकाणाहून घरी परतत होते. तर कुणी आपल्या मामाच्या लग्नासाठी दुसऱ्या शहरातून तिथे आलं होतं.  अशा निष्पाप सात जणांचा जगण्याचा हक्क हिरावून घेण्याचा हक्क बेस्ट बसला कुणी दिला? चूक नेमकी कुणाची? हे सर्व प्रश्न आहेतच, पण निष्पापांच्या कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावणारा आहे. 

कुर्ल्यातल्या बेस्ट बसच्या अपघातात सात निष्पापांचा जीव गेला. या अपघातात कुणी आपली मुलं गमावली, तर कुणी आपली आई. त्या कुटुंबात अवघ्या एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. त्यामुळं कुटुंबीयांची व्यथा, त्यांचं दु:ख हे कुणाच्याही हृदयाला पाझर फोडेल असंच आहे. अनेकजण तर रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत, त्यांचा दोष काय? त्यांच्या वाट्याला हे भोग कुणामुळे? कुर्ल्यातील बस अपघातात ज्यांनी जीव गमावला, त्यांच्या कहाण्या सुन्न करणाऱ्या आहेत. तसेच, जे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतायत, त्यांची कहाणीही मनाला चटका लावणारी आहे. अचानक मृत्यूनं घातलेल्या तांडवामुळं कुणाला आपली लेक, कुणाला आई तर कुणाला पोटचा मुलगा गमवावा लागलाय. अशाच कुर्ला अपघातातील मन छिन्नविछिन्न करणाऱ्या काही कहाण्या... 

मोबाईलच्या रिंगमुळे आईचा मृतदेह सापडला अन्... 

आपल्या लेकाचं लग्न हा कुठल्याही आईच्या आयुष्यातल्या एक अनमोल क्षण. पंचावन्न वर्षांच्या कणीस फातिमा अन्सारी हाच क्षण आयुष्यभर हृदयात साठवून ठेवण्याच्या तयारीत होत्या. घरी मुलाच्या लग्नाची तयारी सुरु होती. मात्र आता त्या हे लग्न त्या कधीच पाहू शकणार नाहीत. बेस्ट बसचा अपघात झाला, त्याच रस्त्यावर असलेल्या देसाई रुग्णालयात त्या काम करायच्या. ड्युटीवर जात असताना त्यांना बसनं जोरदार धडक दिली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. लगीनघाई सुरु असणाऱ्या या कुटुंबावर फातिमा यांच्या दुर्दैवी मृत्युमुळं अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला. आपली आई आता या जगात नाही, यावर त्यांच्या दोन मुलांचा आणि दोन मुलींचा अजूनही विश्वास बसत नाही.

लेक गेली, वडील अत्यवस्थ...

आपल्या कामासाठी सीएमएमटीला गेलेली वीस वर्षांची अनम जेव्हा काम संपवून कुर्ल्याला परतली, तेव्हा रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी होती. रिक्षाही मिळत नसल्यामुळं तिनं वडिलांना स्टेशनला बोलावलं. आपल्या लाडक्या लेकीला तिच्या वडिलांनी काही वेळातच पिक-अप केलं. मात्र, अनमला ते घरी पोहोचवू शकले नाहीत. वाटेत याच बसनं दिलेल्या जोरदार धडकेत तिचा मृत्यू झाला. आपली अनम या जगात नाही, याची अद्याप तिच्या वडिलांना कल्पनाही नाही. गंभीर जखमी झालेले तिचे वडीलही सध्या मृत्यूशी झुंज देतायत. आता तरी प्रशासनानं अनधिकृत फेरीवाल्यांना उठवावं, अशी कळकळीची विनंती अनमचे मामा अजगर यांनी केली आहे.

नोकरीचा पहिला दिवस, आयुष्याचाच पहिला दिवस ठरला... 

जी कथा अनमची तीच विशीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या आफरिनची. आफरिनचा नोकरीचा पहिला दिवस होता. अनमप्रमाणं तिलाही कुर्ला स्टेशनवर रिक्षा मिळत नव्हती. तिनं वडिलांना फोन केला, मात्र वडिलांनी तिला चालत यायला सांगितलं. त्यानंतर काही वेळानं तिच्या वडिलांना एक फोन आला. मुलीच्या अपघाताची बातमी ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. धावतपळत ते हॉस्पिटलला पोहोचले. मात्र, तोपर्यंत आफरिन या जगातून निघून गेली होती. नोकरीचा पहिला दिवस कसा गेला, हे न सांगताच आफरिन या जगातून निघून गेली. 

भूक लागली म्हणून खायला आणायला गेला अन् काळरुपी बेस्ट बसच्या चाकाखाली आला...

अठरा वर्षांचा हा शिवमदेखील आता या जगात नाही. वडिलांसोबत त्यांच्या मित्राच्या दुकानात गेलेल्या शिवमला भूक लागली होती. खायला काहीतरी आणावं, यासाठी रस्त्यावर गेलेल्या शिवमला या काळरुपी बसनं गाठलं. अपघाताचा आवाज ऐकून त्याचे वडील आणि मित्र इतरांच्या मदतीसाठी धावले. बसखाली आलेल्या एका व्यक्तीला त्यांनी बाहेर काढलं. आणि तेवढ्यात आपलाच शिवम बाजूला निपचित पडल्याचं त्यांना दिसलं. रुग्णालयात उपचारादरम्यान शिवमनं अखेरचा श्वास घेतला. शिवमच्या वडिलांचे मित्र बाबर सर्फुद्दिन हे आपल्या डोळ्यासमोर घडलेल्या या घटनेविषयी सांगताना भावुक होतात. तर शिवमचे वडील बुधराज यांना इतका जबर मानसिक धक्का बसलाय की त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नाहीत.

नोकरी करुन कुटुंबाला हातभार लावायचं स्वप्न अधुरं, काळानं गाठलं, सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज... 

कुर्ला बस अपघातात मेहेरबान आलम खान हा 22 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. मेहेरबान यानं दादर येथून कॉम्प्युटर हार्डवेअरचा डिप्लोमा केरला होता. मंगळवारी त्याला बोरीवली हुये नोकरीच्या मुलाखतीसाठी जायचं होतं. मात्र, त्याआधीच सोमवारी तो बस अपघातामध्ये गंभीर जखमी झाला. सायन रुग्णालयात त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तो बेशुद्धावस्थेत असल्याचं त्याचे नातेवाईक अक्रम शेख म्हणाले. त्याचे आई-वडील बिहारमध्ये शेतमजुरी करतात. मुंबईमध्ये नोकरी करून गावी पैसे पाठवायचे, असं मेहेरबानचे स्वप्न आहे, असेही लेख पुढे म्हणाले. 

मामाच्या लग्नासाठी गेला, पण वाटेतच काळाचा घाला

19 वर्षांचा इंझामाम उल हक मामाच्या लग्नासाठी गोवंडीहून कुर्लाला आला होता. पण वाटेतच त्यांना बसनं गाठलं. गोवंडी परिसरातून अनेक जण निघाले होते. हॉलवर पोहचणार तितक्यात बसनं त्यांना 12 जणांना धडक दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेला त्याचा दहा वर्षांचा लहान भाऊ अम्मान रस्त्याच्या दुसऱ्या पलीकडे पडला. मात्र त्याला फार दुखापत झाली नाही. पण इंझामामला गंभीर दुखापत झाली. मोहम्मद साजिद आणि इंझामाम उल हक है दोघे कुर्ता येथे एका टोपी बनवण्याच्या कारखान्यात काम करतात. अपघातात मौहम्मदव्या हाताला आणि पायाला मुक्का मार लागला आहे. तर इंझामाम उल हक रोखच्या कंबरेला दुखापत झाली आहे.

पाहा व्हिडीओ : Kurla Bus Accident : कुणी आई.. तर कुणी लेक गमावली; बस अपघातनंतरच्या कथा आणि व्यथा Special Report

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुळजाभवानी मंदिराला प्राचीन गतवैभव परत मिळणार, पुरातत्व विभागाकडून जीर्णोध्दाराचे काम  सुरू, पहा
तुळजाभवानी मंदिराला प्राचीन गतवैभव परत मिळणार, पुरातत्व विभागाकडून जीर्णोध्दाराचे काम सुरू, पहा
Maharashtra Cabinet Expansion: एकनाथ शिंदेंना नगरविकास खात्यासह एकूण 13 मंत्रिपदं; ठाण्यातील बैठकीला फडणवीस फोनवरुन कनेक्ट, नेमकं काय-काय घडलं?
शिवसेनेला नगरविकास खात्यासह एकूण 13 मंत्रिपदं; ठाण्यातील बैठकीला फडणवीस फोनवरुन कनेक्ट, नेमकं काय-काय घडलं?
Ind vs Aus: सराव सत्रात रोहित शर्माने सर्वांना आश्चर्यचकीत केले; तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाची ब्लू प्रिंट आली समोर
सराव सत्रात रोहित शर्माने सर्वांना आश्चर्यचकीत केले; तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाची ब्लू प्रिंट आली समोर
Pune Accident Update: नाकाबंदीसाठी तैनात महिला कॉन्स्टेबलला उडवलं, फरफटत नेलं, फरार मोटरचालकास अटक
नाकाबंदीसाठी तैनात महिला कॉन्स्टेबलला उडवलं, फरफटत नेलं, फरार मोटरचालकास अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaSachin Kharat :  संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची विटंबना केल्याने परभणी बंदची हाकChandrashekhar Bawankule Meet Eknath Shinde एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 12 मंत्रिपदं मिळण्याची शक्यताTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :  11 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुळजाभवानी मंदिराला प्राचीन गतवैभव परत मिळणार, पुरातत्व विभागाकडून जीर्णोध्दाराचे काम  सुरू, पहा
तुळजाभवानी मंदिराला प्राचीन गतवैभव परत मिळणार, पुरातत्व विभागाकडून जीर्णोध्दाराचे काम सुरू, पहा
Maharashtra Cabinet Expansion: एकनाथ शिंदेंना नगरविकास खात्यासह एकूण 13 मंत्रिपदं; ठाण्यातील बैठकीला फडणवीस फोनवरुन कनेक्ट, नेमकं काय-काय घडलं?
शिवसेनेला नगरविकास खात्यासह एकूण 13 मंत्रिपदं; ठाण्यातील बैठकीला फडणवीस फोनवरुन कनेक्ट, नेमकं काय-काय घडलं?
Ind vs Aus: सराव सत्रात रोहित शर्माने सर्वांना आश्चर्यचकीत केले; तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाची ब्लू प्रिंट आली समोर
सराव सत्रात रोहित शर्माने सर्वांना आश्चर्यचकीत केले; तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाची ब्लू प्रिंट आली समोर
Pune Accident Update: नाकाबंदीसाठी तैनात महिला कॉन्स्टेबलला उडवलं, फरफटत नेलं, फरार मोटरचालकास अटक
नाकाबंदीसाठी तैनात महिला कॉन्स्टेबलला उडवलं, फरफटत नेलं, फरार मोटरचालकास अटक
Kurla Bus Accident: अपघातानंतर चालक संजय मोरे ढसाढसा रडायला लागला, संतप्त जमावाच्या तावडीतून 'या' व्यक्तीने कसेबसे सोडवले
अपघातानंतर चालक संजय मोरे ढसाढसा रडायला लागला, संतप्त जमावाच्या तावडीतून 'या' व्यक्तीने कसेबसे सोडवले
Maharashtra Winter Temperature drops: नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला, सातपुड्यात दवबिंदू गोठले, घरांवर हिमकणांची चादर
नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला, सातपुड्यात दवबिंदू गोठले, घरांवर हिमकणांची चादर
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
Maharashtra Cabinet Expansion: महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, एकनाथ शिंदे वेगळाच पॅटर्न वापरणार?
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, नाराजी थोपवण्यासाठी शिवसेनेत फिरती मंत्रिपदे?
Embed widget