एक्स्प्लोर

Kolhapur CPR : सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन

Kolhapur News: छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयातील वैद्यकीय देयक घोटाळ्याप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागातील दोन मोठ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Kolhapur CPR News: कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयातील वैद्यकीय देयक घोटाळ्याप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांच्या जिल्ह्याती आरोग्य विभागातील दोन मोठ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक प्रशांत वाडीकर आणि माजी जिल्हा शल्य चिकित्सक सुप्रिया देशमुख यांचे निलंबन करण्यात आले आहे. वैद्यकीय बिलांच्या फाइल्सच्या मंजुरीसाठी कोणाला किती पैसे दिले, याचा हिशेब असलेल्या नोंदवहीप्रकरणी हि कारवाई करण्यात आली आहे. बिलासाठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांवर ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, एकाच वेळी आजी- माजी जिल्हा शल्य चिकित्सकांवर निलंबनाची कारवाई होणं हि पहिलीच वेळ असल्याचे बोललं जात आहे.

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्यसेवेच्या इतिहासातील पहिलीच घटना

वैद्यकीय बिलांच्या फाइल्सच्या मंजुरीसाठी कोणाला किती पैसे दिले, याचा हिशेब असलेल्या नोंदवहीप्रकरणी आधीच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख आणि विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणामध्ये हे दोन्ही आजी, माजी जिल्हा शल्यचिकित्सक समसमान दोषी असल्याचे चौकशी समितीने अहवालात स्पष्टपणे नमूद केले होते. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या प्रकरणी चौकशीसाठी आदेश दिले होते. चौकशीसाठी आरोग्य विभागाच्या तीन अधिकाऱ्यांची समिती नेमली होती. चौकशी अंती सादर करण्यात आलेल्या अहवालात दोन्ही जिल्हा शल्य चिकित्सक दोषी असल्याचे समोर आलं आहे. परिणामी एकाच वेळी आजी- माजी जिल्हा शल्य चिकित्सकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Kolhapur CPR News: नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी कार्यकर्त्यांसह सीपीआर मध्ये 8 डिसेंबर 2025 रोजी एक स्टिंग ऑपरेशन केलं होता. यावेळी वैद्यकीय बिलांच्या फाइल्स मंजूर करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या पैशांच्या देवाण-घेवाणीची तारीखवार नोंद असलेली लाल वहीच सापडली होती. देशमुख या सहायक संचालक, आरोग्य सेवा परिमंडळ, पुणे येथे कार्यरत आहेत. दरम्यान या प्रकरणाच्या दुसऱ्याच दिवशी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात बोट ठेवत हे प्रकरण समोर आणण्यात आलं. त्यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, हिवताप विभागाचे सहायक संचालक डॉ. संजय रणवीर, सांगलीच्या सीएस कार्यालयातील दीपक वरक यांची चौकशी समिती नेमली होती. या समितीने 500 हून अधिक पानांचा चौकशी अहवाल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वरिष्ठांना सादर केला होता. त्यावर या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला. अनिल कुमेरीये, कार्यासन अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या सहीचे याबाबत आदेश आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या  

महत्त्वाच्या बातम्या

नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
दीड लाखांची लाच स्वीकारताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाच पकडलं, जालन्यात खळबळ, पाच जण ACB च्या जाळ्यात 
दीड लाखांची लाच स्वीकारताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाच पकडलं, जालन्यात खळबळ, पाच जण ACB च्या जाळ्यात 
Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
Beed Jail Walmik Karad: बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget