Kalyan Crime News : गु्ंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा; कल्याणचा ठग शिर्डीतून ताब्यात
Kalyan Crime News : कल्याणमधील सामान्य गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या दर्शन परांजपे याला शिर्डीतून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Kalyan Crime News : कल्याणमध्ये अनेक गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणारा दर्शन परांजपे याला शिर्डी (Shirdi) येथून कल्याण पोलिसांनी (Kalyan Police) ताब्यात घेतले आहे. पोलिसांचे एक पथक नाशिकहून परांजपेला घेऊन कल्याणच्या दिशेने निघाले आहे. दर्शन परांजपे याच्या विरोधात आतापर्यंत दहा कोटी रुपयांची (Share Market Fraud Case) फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. ही फसवणूक 20 ते 25 कोटी रुपयांपर्यंत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
कल्याणमधील पारनाका परिसरात राहणाऱ्या दर्शन याने अनेकांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास त्याच्या बदल्यात 80 टक्के दराने परतावा देतो असे सांगितले होते. कल्याणमधील अनेक लोकांनी त्याच्याकडे गुंतवणूक केली. मात्र त्यांना मूळ रक्कम आणि व्याज न मिळाल्याने त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्याने सांगितले की, शेअर बाजारात गुंतविलेले पैसे बुडाले. मी पैसे कुठून देऊन. हे ऐकताच गुंतवणूकदारांच्या पायाखालची वाळूच सरकली.
लोकांनी त्यांच्या जीवनभराची पूंजी दर्शनकडे दिली होती. या प्रकरणात बाजारपेठ पोलीस ठाण्यात दर्शनच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याचे कळता दर्शन हा पसार झाला. कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शनचा शोध सुरु करण्यात आला.
तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिस त्याचा शोध घेत होते. बाजारपेठ पोलिसांना माहिती मिळाली की, शुक्रवारी शिर्डी पोलिसानी दर्शनला ताब्यात घेतले आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी अजिंक्य मोरे यांच्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक शिर्डीच्या दिशेने रवाना झाले. बाजारपेठ पोलिसांनी दर्शनला ताब्यात घेतले आहे. पुढील प्रक्रिया करुन पोलिस त्याला घेऊन कल्याणच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र दर्शन कुठे लपला होता. त्याला पोलिसांनी कसे ताब्यात घेतले. त्याने अन्य किती लोकांना कसा गंडा घातला आहे. याचा तपास बाजारपेठ पोलीस करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
भर रस्त्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; कल्याण पूर्वेतील संतापजनक प्रकार
शिकवणी वर्गाहून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका सराईत गुन्हेगाराने बलात्काराचा प्रयत्न केल्याची संतापजनक प्रकार घडला आहे. कल्याण पूर्व परिसरात ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी विशाल गवळी या नराधमाला कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे विशालने या मुलीचा स्कुटीने पाठलाग केला होता. संधी मिळताच आरोपी विशालने एका कोपऱ्यात तिला खेचत नेले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडित विद्यार्थीनिने तिची सुटका करत कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
आरोपी विशाल गवळी याच्या विरोधात याआधी देखील बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. विशाल गवळीला या आधी तडीपार देखील करण्यात आले होते.